सत्यपाल मलिक यांची Governor of Meghalaya पदी बदली; महाराष्ट्राचे राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्‍त पदभार

दरम्यान 25 ऑक्टोबर 2019 साली त्यांची नियुक्ती राष्ट्रपती कार्यालयाकडून गोव्याचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती.

Satya Pal Malik | (Photo Credits: PTI)

गोव्याचे (Goa) राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik)यांची बदली आता मेघालय राज्याच्या राज्यपाल (Governor of Meghalaya) पदी करण्यात आली आहे. तर आता महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor of Maharashtra) भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे महाराष्ट्रासोबत गोवा राज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतीच राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्याबाबतचे एक पत्रक जारी करण्यात आले आहे.

ANI Tweet

सत्यपाल मलिक हे गोव्याचे 25 वे राज्यपाल होते. दरम्यान 25 ऑक्टोबर 2019 साली त्यांची नियुक्ती राष्ट्रपती कार्यालयाकडून गोव्याचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. Tathagata Roy यांच्या जागी आता सत्यपाल मलिक यांची नियुक्ती  झाली आहे. दरम्यान सत्यपाल मलिक गोव्याच्या पूर्वी जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.