Udhayanidhi Stalin On Sanatana Dharma: 'सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा', एम के स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांचे वक्तव्य

त्यामुळे फक्त त्या संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. आपल्याला ते संपवावे लागते. त्यामुळे सनातलनाही आपण अशाप्रकारेच सनातनला संपवायचे आहे.

Udhayanidhi Stalin | Photo Credit - Facebook)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा आहे. हे वक्तव्य करताना त्यांनी शनिवारी म्हटले की, 'सनातन धर्म (Sanatana Dharma) डेंग्यू (Dengue) आणि मलेरिया (Malaria) सारखा आहे. त्याला केवळ नुसता विरोध नको, तर त्याचे ‘निर्मूलन’ केले पाहिजे, असे म्हटले. ते 'सनातन निर्मूलन परिषदेत' बोलत होते. सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे. ते सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. त्यामुळे सनातनाला विरोध करण्यापेक्षा ते नष्ट केले पाहिजे, असे उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले. उल्लेखनीय असे की, ते सत्ताधारी द्रमुक सरकारमधील युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री आहेत. पुढे ते असेही म्हणाले की, काही गोष्टींना विरोध करता येत नाही. त्यामुळे फक्त त्या संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. आपल्याला ते संपवावे लागते. त्यामुळे सनातलनाही आपण अशाप्रकारेच सनातनला संपवायचे आहे, असे उदयनीथी यांनी म्ह्टल्याचे वृत्त एएनआय संस्थेने दिले आहे.

दरम्यान, उदयनिधी यांच्या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. तीव्र प्रतिक्रीया व्यक्त करत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, उदयनिधी स्टॅलिन हे 80 टक्के लोकांच्या नरसंहाराचे आवाहन करत आहेत.

अमित मालवीय यांनी पुढे म्हटले आहे की, द्रमुक हा विरोधी पक्षाचा प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकाळचा मित्र आहे. मुंबईच्या बैठकीत हाच अजेंडा ठरला आहे का? असा सवाल अमित मालवीय यांनी X च्या माध्यमातून विचारला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif