Mumbai: सॅमसंगने ‘एआय होम’ या नव्या व्हिजनचे मुंबईत केले अनावरण
सॅमसंगचे 'एआय होम' ही एक अत्याधुनिक कनेक्टेड लिव्हिंग इकोसिस्टम आहे. यामध्ये घरातील उपकरणे (Appliances), डिव्हाइसेस आणि विविध सेवांना एकात्मिक पद्धतीने जोडले जाते, ज्यामुळे वापरकर्त्यांना अभूतपूर्व सोयीसुविधा, उत्कृष्ट ऊर्जा कार्यक्षमता आणि वैयक्तिकृत अनुभव मिळतो.
मुंबई: भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड असलेल्या सॅमसंगने, बुधवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा, बीकेसी येथील त्यांच्या प्रमुख स्टोअरमध्ये 'एआय होम: फ्युचर लिव्हिंग, नाऊ' या त्यांच्या क्रांतिकारी व्हिजनचे अनावरण केले. सॅमसंगचे 'एआय होम' ही एक अत्याधुनिक कनेक्टेड लिव्हिंग इकोसिस्टम आहे. यामध्ये घरातील उपकरणे (Appliances), डिव्हाइसेस आणि विविध सेवांना एकात्मिक पद्धतीने जोडले जाते, ज्यामुळे वापरकर्त्यांना अभूतपूर्व सोयीसुविधा, उत्कृष्ट ऊर्जा कार्यक्षमता आणि वैयक्तिकृत अनुभव मिळतो. या संपूर्ण परिसंस्थेमध्ये वापरकर्त्यांची सुरक्षितता आणि गोपनीयता हे सर्वोच्च प्राधान्य आहे.
या लाँचची खासियत म्हणजे सॅमसंगचा फ्यूचर लिव्हिंग दृष्टिकोन: सर्वोत्तमता फक्त एकाच डिवाईसपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक स्क्रिन, अप्लायन्स आणि सर्विसमध्ये विनासायासपणे शेअर केली जाईल असे विश्व घडवणे. एआय होममध्ये तीन मूलभूत क्षमतांच्या माध्यमातून या दृष्टिकोनाचा समावेश आहे आणि त्या तीन क्षमता आहेत: सॅमसंगचे एआयमधील नेतृत्व, त्यांच्या डिवाईस पोर्टफोलिओची अद्वितीय सखोलता आणि विश्वसनीय, सुरक्षित परिसंस्था.
कल्पना करा की घर तुम्हाला ओळखते. तुम्ही घरामध्ये येताच लाइट सुरू होतात, झोपेदरम्यान तापमानानुसार एअर कंडिशनर समायोजित होते, वॉशिंग मशिन योग्य वॉश चक्राची शिफारस करते आणि टीव्ही तुमच्या आवडत्या मालिका एकामागोमाग सुरू करतो, हे सर्व आपोआपपणे होते. सॅमसंग एआय होम फक्त काहीजणांसाठी नाही तर सर्वांसाठी या दैनंदिन वास्तविकतेला शक्य करते.
अॅम्बियण्ट इंटेलिजण्ससह सिस्टम सतत वापरकर्त्यांच्या वर्तणूकीला आणि आसपासच्या वातावरणाला जाणून घेते, ज्यानंतर आपोआपपणे आरामदायीपणा, केअर, ऊर्जा बचत व सुरक्षितता देते. तुम्ही आराम करत असताना उत्साही वातावरण देणाऱ्या एसीपासून तुमच्या आहारसंबंधित ध्येयांनुसार आहाराचा सल्ला देणारा फ्रिज, पार्श्वभूमीमध्ये विनासायासपणे संलग्न होणाऱ्या स्मार्टथिंग्ज-सक्षम डिवाईसेसपर्यंत प्रत्येक परस्परसंवाद संदर्भीय, मानव-केंद्रित सर्वोत्तम असतो.
भारतात आता फ्यूचर लिव्हिंग
“सॅमसंगमध्ये आम्ही आमच्या स्मार्टथिंग्ज परिसंस्थेच्या माध्यमातून गॅलेक्सी एआय, व्हिजन एआय व बीस्पोक एआयच्या एकीकरणासह एआयच्या भविष्याची कल्पना करत आहोत, तसेच व्यक्तींच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. येथे सॅमसंग एआय होमच्या लाँचसह आम्ही भारतातील घराघरांमध्ये फ्यूचर लिव्हिंग आणत आहोत, ज्यामुळे दैनंदिन राहणीमान अधिक सोईस्कर, कार्यक्षम, आरोग्यदायी व सुरक्षित होईल. भारत या प्रवासामध्ये महत्त्वाचा आहे. भारतातील आमचे तीन आरअँडडी केंद्रे येथे उत्साहवर्धक एआय नाविन्यतांना आकार देत आहेत आणि जगभरात घेऊन जात आहेत. या लाँचमधून भारतातील लाखो कुटुंबांच्या भावी जीवनशैलींना अर्थपूर्ण आणि सुरक्षित तंत्रज्ञानांच्या माध्यमातून आकार देण्याप्रती आमची दृढ कटिबद्धता दिसून येते,'' असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्हणाले.
सॅमसंग एआय होम श्रेणींमध्ये सक्रिय व सुसंगत असलेल्या अनुभवांवर डिझाइन करण्यात आले आहे. डिवाईसेस व वीअरेबल्समधील गॅलेक्सी एआय चालता-फिरता उत्पादकता आणि स्वास्थ्याला चालना देते. व्हिजन एआय टीव्हीमध्ये नैसर्गिक भाषेमध्ये परस्परसंवाद व स्मार्ट शिफारशी देते आणि बीस्पोक एआय अप्लायन्सेस घरातील कामांबाबत अंदाज करण्याची आवश्यकता दूर करते. डिवाईसेसमध्ये एकीकृत यूआयसह ही सर्व वैशिष्ट्ये एकत्र काम करत सर्वोत्तम घराची निर्मिती करतात, जे तुमच्यासाठी आणि तुमच्यासह काम करते. या सर्वांमध्ये विशेषतता म्हणजे सॅमसंग स्मार्टथिंग्ज अॅप, जो हजारो सहयोगी डिवाईसेससोबत सॅमसंग उत्पादनांशी कनेक्ट होतो. हे घर तुम्हाला, तुमच्या गरजांना आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींना ओळखते. हे आहे फ्यूचर लिव्हिंग, नाऊ.
एआय होम अनुभव: ईज, केअर, सेव्ह, सेक्युअर
सॅमसंग एआय स्मार्ट होम चार वैशिष्ट्यांवर डिझाइन करण्यात आले आहे, जे एकत्रित कुटुंबांच्या राहणीमानाला नव्या उंचीवर घेऊन जातात. यामधील मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे ईज, जे जीवन सोपे करते, दैनंदिन नित्यक्रम विनासायासपणे स्वयंचलित करते, ज्यामुळे वैयक्तिक द्वारपाल असल्यासारखे वाटते. लाइट, तापमान आणि घरातील कामे देखील आपो आपपणे समायोजित होतात, ज्यामुळे मोकळा वेळ मिळण्यासोबत ऊर्जा बचत होते, जे सर्वात महत्त्वाचे आहे.
तितकेच महत्त्वाचे आहे केअर, जे कुटुंबाच्या स्वास्थ्याला प्राधान्य देते. कनेक्टेड डिवाईसेस व सर्विसेसच्या माध्यमातून एआय होम वैयक्तिक झोपेच्या सवयी व आरोग्याची तपासणीपासून पोषण नियोजन आणि प्रियजन व पाळीव प्राण्यांसाठी केअरपर्यंत आरोग्यदायी जीवनशैलींना साह्य करते.
सिस्टम देखील सेव्हच्या माध्यमातून सर्वोत्तम व मापनीय फायदे देते. स्मार्टथिंग्ज एनर्जीसह घरे अधिक कार्यक्षम होतात, ऊर्जा वापर कमी होतो आणि खर्च कमी होतो. वॉशिंग मशिनसाठी होणारा ऊर्जा वापर जवळपास ७० टक्क्यांनी कमी होऊ शकतो[1,2].. या सर्वोत्तम बचती घरगुती खर्च कमी करण्यासोबत हरित पर्यावरणाप्रती देखील योगदान देतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)