Akhilesh Yadav on UP Election Results: उत्तर प्रदेश निवडणूक निकालावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया
भारतीय पक्षाला यशस्वी टक्कर देऊनही समाजवादी पक्ष (Samajwadi Party) पराभूत झाला. या पराभवावर सपा (SP) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh Election Results 2022) सत्ता कायम राखण्यात भारतीय जनता पक्ष (BJP) यशस्वी ठरला. भारतीय पक्षाला यशस्वी टक्कर देऊनही समाजवादी पक्ष (Samajwadi Party) पराभूत झाला. या पराभवावर सपा (SP) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानत ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना अखिलेश यांनी म्हटले आहे की, 'आमच्या जागा आणि मतदानाचा टक्का वाढविल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार. आम्ही दाखवून दिले की, भाजपच्या जागा कमी करता येऊ शकतात. भाजपची ही घट कायम राहील. त्यांचा आर्धा गैरसमज दूर झाला आहे. बाकीचा पुढच्या काही दिवसांमध्ये दूर होईल. जनतेचीच लढाई जिंकेल.'
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत 273 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयासह भाजपने उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण बहुमत मिळवले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी हा सर्वात मोठा विरोधी पक्ष राहिला आहे. समाजवादी पक्षाला 111 जागा मिळाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या मैनपूर येथील करहल विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एस पी सिंह बघेल यांचा पराभव केला. त्यांनी 67441 मतांनी बघेल यांचा पराभव केला. (हेही वाचा, Shiv Sena on BJP: पाच राज्यांत भाजपच्या यशावर शिवसेनेची 'सामना'तून तिखट प्रतिक्रिया म्हटले, 'माकडाच्या हाती दारूची बाटली आल्यावर..')
अखिलेश यादव यांना 148196 मते मिळाली आहेत. एकूण मतांपैकी ही मते 60.12% इतकी आहेत. दुसऱ्या ठिकाणी भाजप उमेदवार एसपी सिंह बघेल यांना 80455 जागा मिळाल्या आहेत. तर याच मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बसपाच्या कुलदीप नारायण यांना 15701 जागा मिळाल्या आहेत.