Salman Khan New Look: सलमान खानच्या नव्या लुकची होतेय चर्चा, चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी; या चित्रपटाची होतेय तयारी?
सलमान खान मुंबईतील एका पार्टीत नव्या लुक मध्ये दिसला. सलमानचा हा लुक सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Salman Khan New Look: बॉलिवूडचा सुपरस्टार सध्या सलमान खान 2023 च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक असलेल्या 'टायगर 3' च्या रिलीजची तयारी करत आहे. सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरं तर, रविवार, 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील एका पार्टीत बॉलिवूडचा भाईजान त्याच्या नव्या लुकमध्ये दिसला. सलमान खान 'तेरे नाम 2' ची तयारी करत असल्याच्या या अभिनेत्याच्या नव्या लूकबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या कारमधून उतरताना दिसत आहे. भाईजान एका पार्टीत सहभागी होण्यासाठी मुंबईत आला होता. यादरम्यान, अभिनेता नवीन लूकमध्ये दिसला. या पार्टीसाठी सलमानने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. चाहते व्हिडिओमध्ये चाहते ‘भाई, भाई’ असे ओरडताना ऐकू येतात. त्याचवेळी सलमानच्या या नव्या लुकचे फोटो काढले आणि व्हिडिओ बनवला.
View this post on Instagram
या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आणि आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर टायगर आणि झोयाच्या जोडीची पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सलमान खानच्या नव्या लुकची आणि तेरे नाम २ या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. सलमानच्या चाहत्यांना आंनदाची बातमी मिळाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2023 11:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

