Salary Details and Pay Transparency: नोकरीच्या जाहिरातींमध्ये पगाराचा तपशील आणि वेतनाबाबत पारदर्शकता समाविष्ट करण्यामध्ये वाढ; दिल्ली आघाडीवर

यामध्ये गेल्या एका वर्षात 64 टक्के आणि गेल्या तीन वर्षांत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अलिकडच्या काही महिन्यांत भारतातील सर्वोत्कृष्ट प्रतिभावान तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या नवनवीन हातखंडे अवलंबत असल्याचे दिसत आहेत. यातील एक म्हणजे. वेतन पारदर्शकता (Pay Transparency) आणि पगाराच्या तपशीलाबाबत (Salary Details) माहिती दिली. नोकरीच्या जाहिरातीवेळी कंपन्या वेतन पारदर्शकता आणि पगाराच्या तपशीलांबाबत माहिती देत आहेत. एका अहवालात ही बाब दिसून आली.

इंडिड वेबसाईटवरील संपूर्ण भारतीय जॉब पोस्टिंगपैकी सुमारे 46 टक्के नियोक्त्यांनी दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीमध्ये पगाराच्या माहितीचा समावेश आहे. यामध्ये गेल्या एका वर्षात 64 टक्के आणि गेल्या तीन वर्षांत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे जॉब पोर्टलने म्हटले आहे.

दिल्ली (208 टक्के), मुंबई (71 टक्के), बंगळुरू (63 टक्के) या शहरांमध्ये नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे, तसेच इथल्या नियोक्त्यांनी संभाव्य नोकरी शोधणाऱ्यांना पगाराचा डेटा दिला आहे. मात्र अजूनही टियर 2 आणि 3 शहरे पगाराबाबतच्या पारदर्शकतेपासून खूप दूर आहेत. नाशिक, सुरत सारख्या शहरांमध्ये पगाराच्या तपशिलांसह असलेल्या नोकरीच्या जाहिरातींमध्ये घट होत आहे. अहमदाबाद, वडोदरा आणि मोहाली सारख्या इतर शहरांमध्ये वेतनाच्या पारदर्शकतेवर अनुक्रमे 2 टक्के, 15 टक्के आणि 18 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.

याबाबत इंडिड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले, 'उत्तम आणि प्रतिभावान उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी भारतातील नियोक्ते नवीन रणनीतींचा अवलंब करून बदलत्या लोकसंख्याशास्त्राशी जुळवून घेत आहेत. उच्च अ‍ॅट्रिशन दर आणि कुशल कामगारांसाठी असलेली तीव्र स्पर्धा यामुळे वेतन पारदर्शकतेकडे वळणे आवश्यक ठरले आहे.’ भारतात वेतन पारदर्शकता अनिवार्य करणारा कोणताही कायदा नाही. मात्र सध्याची पिढी जिथे त्यांना वेतन पारदर्शकता मिळत आहे तिकडे आकर्षित होत आहेत. वर आल्यापासून कामाच्या ठिकाणी बदल झाला आहे, जे वेतन पारदर्शकतेचा स्वीकार करत आहेत. (हेही वाचा: Foxconn to Invest in India: फॉक्सकॉन भारतात करणार 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक; 25,000 लोकांना मिळणार नोकऱ्या)

वित्त, अभियांत्रिकी आणि गणित यासारख्या उच्च वेतनाच्या व्यवसायांमध्ये वेतन पारदर्शकता सर्वात वेगाने वाढली आहे. दरम्यान, रिमोट जॉब पोस्टिंगमध्ये देखील पगाराच्या माहितीत 76 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जे भारतीय लँडस्केपमध्ये दूरस्थ नोकऱ्या किती महत्त्वाच्या आहेत हे दर्शविते.