Sahitya Akademi Award 2020: साहित्य क्षेत्रातील मानाच्या 'साहित्य अकादमी पुरस्कारां'ची घोषणा; मराठीमध्ये नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला मिळाला मान
इंग्रजी भाषेत सुश्री अरुंधती सुब्रमण्यम, श्री हरीश मीनाश्रू (गुजराती), श्री आर.एस. भास्कर (कोंकणी), श्री ईरुंगबम देवेन (मणिपुरी), श्री रूपचंद हांसदा (संताली) आणि श्री निखिलेश्वर (तेलगू) यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारतामधील साहित्य क्षेत्रातील सर्वात मानाचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची (Sahitya Akademi Award 2020) घोषणा झाली आहे. साहित्य अकादमीने आज 20 भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केले. साहित्य अकादमी पुरस्कार सात काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या, पाच कथासंग्रह, दोन नाटक, एक संस्मरण आणि एक महाकाव्यासाठी जाहीर करण्यात आले. साहित्य पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत, पुरस्कारासाठी साहित्याची शिफारस 20 भारतीय भाषेच्या न्यायाधीश समित्यांनी केली होती.
1 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. बक्षीस विजेत्यास पुढील तारखेला एका विशेष कार्यक्रमात स्मृतिचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांची रक्कम देण्यात येईल.
साहित्य अकादमी पुरस्कारासाठी हिंदी भाषेत नामांकित कवयित्री अनामिका यांची निवड झाली. इंग्रजी भाषेत सुश्री अरुंधती सुब्रमण्यम, श्री हरीश मीनाश्रू (गुजराती), श्री आर.एस. भास्कर (कोंकणी), श्री ईरुंगबम देवेन (मणिपुरी), श्री रूपचंद हांसदा (संताली) आणि श्री निखिलेश्वर (तेलगू) यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रख्यात अनुवादक, कवी, लेखक आणि समीक्षक अनामिका यांना 'टोकरी में दिगन्त' या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
कादंबरी शैलीत, नागपूरचे नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला मराठीसाठी 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पुढे, डॉ. महेशचंद्र शर्मा गौतम (संस्कृत), श्री इमाम्याम (तमिळ) आणि श्री हुसेन-उल-हक यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. मराठीमध्ये आबा महाजन- आबाची गोष्ट (बालसाहित्य) साठीही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.