शबरीमाला मंदिरात कोण जात नाही म्हणून श्रीलंका येथून लोकांची खुसखोरी केली जातेय- RSS प्रमुख मोहन भागवत
शबरामाला मंदिरात सध्या कोणीही जात नसल्याने श्रीलंका येथून लोकांना आणून मंदिराच्या पाठील बाजूच्या दरवाज्याने मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (RSS) याचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्याच्या वेळी विश्व हिंदू परिषदेच्या धर्म संसदेच्या दरम्यान शबरीमाला मंदिरावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मात्र करोडो हिंदू धर्मियांच्या भावनांचा आदर केला जाईल याबाबत कोर्टाने कोणताही विचार केला नाही. भागवत यांनी असे म्हटले की, शबरीमाला मंदिरात (Sabrimala Mandir) जर महिलांना प्रवेश करायचा असेल तर त्यांना त्याची परवानगी कोर्टाने द्यायला पाहिजे. तर कोणत्याही महिलेला मंदिरात जाण्यापूर्वी अडवले जाते. परंतु महिलेला सुरक्षितता देऊन भाविक जेथून दर्शन घेतात तेथून दर्शनासाठी नेण्यात यावे. परंतु सध्या कोणीही मंदिरात जात नसल्याने श्रीलंका (Shri Lanka) येथून लोकांना आणून मंदिराच्या पाठील बाजूच्या दरवाज्याने मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
दरम्यान, वीएचपी (VHP) यांच्याकडून प्रयागराज कुंभ येथे गुरुवारपासून धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आयोजित करण्यात आलेले हे धर्म संसद 1 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. या धर्म संसदेत देशभरातून 5,000 साधू संत उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे वीएचपीकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.
धर्म संसदेपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात सकाळी भेट झाली. तसेच उद्यापर्यंत या संसदेत राम मंदिर प्रकरणी पूर्ण प्रस्ताव येणार असल्याचे सांगितले जात आहे.