RBI कडून 50 रुपयांची नवी नोट चलनात, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी
शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात चलनात आलेली ही पहिलीच नोट आहे. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नोट चलात आणल्या होत्या.
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय (RBI) ने 50 रुपयांची नवी नोट (Rs 50 Notes) चलनात आणली आहे. या नोटेवर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांची सही असणार आहे. विशेष म्हणजे आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल (Urjit Patel) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर गव्हर्नर पदावर आरुड झालेल्या शक्तिकांत दास यांच्या हस्ताक्षरातील ही पहिलीच नोट आहे. 50 रुपयांच्या इतर नोटांच्या डिझाईनप्रमाणे या नव्या नोटेवरही महात्मा गांधी यांची प्रतिमा आणि इतर गोष्टी आहेत.
दरम्यान, 50 रुपयांची नवी नोट चलनात आणली असली तरी, चलनात असलेल्या 50 रुपयांच्या जुन्या नोटांना कोणताही धोका नाही. नव्या नोटेसोबत जुन्या नोटाही पूर्ववतपणे चलनात राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. नोटबंदीनंतर सुमारे दोन वर्षांनंतर 18 ऑगस्ट 2018 रोजी आरबीआयने निळ्या रंगाती 50 रुपयांची नोट चलनात आणली होती. त्या वेळी उर्जित पटेल हे गव्हर्नर होते. ती नोटही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या श्रृंकलेमधीलच होती. यात पाठीमागच्या बाजूला रथासोबत हम्पी येथील मंदिराची प्रतिमा आहे. (हेही वाचा, कर्जबुडव्यांना लगाम, एकाच क्लिकवर कर्जदाराची कुंडली; 'आरबीआय'चे डिजिटल पाऊल)
उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये शक्तिकांत दास यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनविण्यात आले. शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात चलनात आलेली ही पहिलीच नोट आहे. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नोट चलात आणल्या होत्या.