Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 9,000 जागांसाठी पदभरती

यासोबतच ITI उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे.

Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतीय रेल्वेने (Indian Railway) तरूणांसाठी टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ही (RRB) टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया जारी केली आहे. ही भरती एकूण ९ हजार जागांसाठी असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख मात्र, अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (हेही वाचा - RPF Recruitment 2024: आरपीएफ मध्ये 2250 पदांसाठी नोकरभरती जाहीर; rpf.indianrailways.gov.in वर पहा सविस्तर माहिती)

ही भरती प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये म्हणजे याच महिन्यात सुरू होणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मात्र, मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर (indianrailways.gov.in) भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल.

या भरतीसाठी उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच ITI उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक, एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या शिवाय, इच्छुक उमेदवाराकडे NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.