RRB-NTPC Result: आंदोलक विद्यार्थ्यांकडून यार्डमध्ये उभ्या रेल्वे बोगीला आग, श्रमजीवी एक्सप्रेसवर दगडफेक; बिहारमधील गया येथील घटना

तर श्रमजिवी एक्सप्रेस गाडीवरही मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. ही घटना गया (Gaya) येथे घडली.

रेल्वे भरती बोर्ड (RRB) च्या नॉन टेक्निकल पॉप्यूलर कैटेगरी (NTPC Exam Result) परीक्षा निकालात झालेल्या कधीत गैरप्रकारावरुन बिहारमध्ये (Bihar) विद्यार्थी अत्यंत आक्रमक झाले आहेत. आक्रमक विद्यार्थ्यांनी आदोलन करत रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या बोगीला आग ( Train Vandalized In Gaya, Bihar) लावली. तर श्रमजिवी एक्सप्रेस गाडीवरही मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. ही घटना गया (Gaya) येथे घडली. विद्यार्थी अत्यंत आक्रमक झाले असून, अनेक ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत. रेल्वे भर्ती बोर्डाने घडल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. रेल्वे बोर्डाने परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. याशिवाय प्रयागराज येथेही नोकरीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी रेल्वे अडविण्याचा प्रयत्न केला.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,बिहारमधील गया येथे आंदोलनकर्त्यांमधील अज्ञातांनी ट्रेनची तोडफोड केली. काही ठिकाणी रेल्वे यार्डातील बोगीला आग लावली. रेल्वे परीक्षेत झालेल्या कथीत गैरप्रकारांमुळे आंदोलकांनी हे कृत्य केल्याचे समजते. CBT 2 परीक्षेची तारीख अधिसूचित करण्यात आली नाही. 2019 मध्ये अधिसूचित झालेल्या रेल्वे परीक्षेचे कोणतेही अपडेट नाही. निकालाची प्रतीक्षा, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन विद्यार्थी आक्रमक आहेत. (हेही वाचा, Viral Video: बिहारमधील ANM आणि आशा वर्कर्स यांच्यातील मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पाचशे रुपयांच्या लाचखोरी ठरली वादाचे कारण)

ट्विट

एका आंदोलक विद्यार्थ्याने म्हटले की, 'सीबीटी 2 परीक्षेची तारीख अधिसूचित करण्यात आली नाही. 2019 मध्ये अधिसूचित रेल्वे परीक्षेबाबतही कोणती कोणत्याही प्रकारची अद्ययावत माहिती नाही. त्याचा निकालही अद्याप जाहीर झाला नाही. आमची मागणी आहे की, सीबीटी-2 परीक्षा रद्द करावी आणि झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करावेत.'