Rohini Acharya आजारी वडील Lalu Prasad Yadav यांना करणार किडनी दान
त्यांची 75% किडनी निकामी झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स मध्ये उपचार सुरू आहेत.
माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या प्रकृती मध्ये मागील काही महिन्यात अनेकदा चढ उतार झाले आहे. किडानी विकाराने त्रस्त असलेल्या लालूंना आता त्यांची लेक आपली किडनी दान करणार आहेत. रोहिणी आचार्य (Rohini Acharya) लालूंना किडनी दान करणार आहे. रोहिणी या ट्वीटर वर बर्याच अॅक्टिव्ह आहेत. अनेकदा त्यांनी मोदी सरकार वर हल्लाबोल केला आहे. रोहिणी या सिंगापूर (Singapore) मध्ये आपले पती, मुलं यांच्यासोबत राहतात. काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव सिंगापूरला गेले होते. तेव्हा त्यांच्या चाचण्या झाल्या. डोनर म्हणून रोहिणी यांच्या देखील चाचण्या झाल्या. रोहिणीला देखील दाता म्हणून डॉक्टरांकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव हे किडनी प्रत्यारोपणासाठी तयार नाहीत. त्यांची कुटुंबियांकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लालू प्रसाद यादव यांना किडनी विकारांसोबत अन्य आजारही आहेत. त्यांची 75% किडनी निकामी झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स मध्ये उपचार सुरू आहेत. भारतामध्ये किडनी उपचारात किडनी प्रत्यारोपणाला येथील डॉक्टरांची परवानगी नाही पण सिंगापूर मध्ये मात्र डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाला सहमती दिली आहे.