Robert Vadra On Rahul Gandhi: राहुल गांधी चांगले नेते, देशाचे भले करतील- रॉबर्ट वाड्रा
धर्मावर आधारित राजकारण करण्याऐवजी देशाच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची राजकीय निती देशाला उज्ज्वल भविष्य मिळवून देईल असेही ते म्हणाले.
Robert Vadra 0n Rahul Gandhi's Leadership: उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सक्षम नेता म्हणून त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. देशाच्या कल्याणासाठी त्यांचे समर्पण आणि धार्मिक राजकारण बाजूला ठेवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर जोर देत ते म्हणाले, राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल उज्ज्वल भविष्याकडे असेल. राहुल यांच्या गुणांवर विश्वास व्यक्त करत वाड्रा यांनी राहुल गांधींसोबतचे त्यांचे जवळचे संबंध अधोरेखित केले. ते म्हणाले, मी नेहमी माझ्या कुटुंबाबद्दल बोलेन. हे स्पष्ट आहे कारण मी त्यांना (राहुल गांधी) ओळखतो, मला आंतरिकरित्या माहित आहे की ते काय विचार करत आहेत. एक नेता म्हणून ते देशासाठी खूप चांगले असतील आणि मला वाटते ते एखाद्या पदासाठी किंवा कोणाला स्वार्थाने फायदा मिळवून देण्यासाठी काम करणार नाहीत.
वाड्रा यांनी पुढे अधोरेखित केले की राहुल गांधींचे नेतृत्व एकता आणि बेरोजगारी, महिला सुरक्षा यासारख्या अत्यावश्यक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करेल. इंडीया आघाडीने निवडलेल्या नेत्याला राष्ट्र स्वीकारेल, असे प्रतिपादन करून त्यांनी सामूहिक दृष्टिकोनाच्या महत्त्वावर भर दिला. सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन देशासाठी पसंतीच्या नेत्याबाबत सामूहिक निर्णय घेतील, असा आशावाद वाड्रा यांनी व्यक्त केला. वाड्रा यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या नेतृत्वाचा देशाला केवळ फायदाच होणार नाही तर विरोधकांची प्रभावीताही वाढेल. त्यांनी टिप्पणी केली की, मला नेहमीच वाटते की राहुल गांधी हे एक चांगले नेते असतील आणि ते देशाचे भले करतील आणि युतीप्रमाणेच विरोधकांचेही भले करतील.
दरम्यान, राहुल गांधी तेलंगणामध्ये काँग्रेससाठी जोरदार प्रचार करत आहेत. तेलंगणा राज्यात 30 नोव्हेंबर रोजी 119 जागांसाठी मतदान पार पडत आहे. त्यानंतर 7 नोव्हेंबरला मिझोराम, 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला छत्तीसगड, 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेश, 25 नोव्हेंबरला राजस्थान मध्ये मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरला पुन्हा एकदा तेलंगणामध्ये मतदान पार पडेल. पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या निकालाचा मोठा परिणाम होईल.
ट्विट
भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांची प्रतिमा 'पप्पू' अशी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आणि त्यांच्या प्रतिमेमध्य अमुलाग्र बदल झाला. भारतीय जनतेच्या मनामथ्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक सहभागी झाले. त्यांच्या यात्रेचे काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणेवर अमुलाग्र प्रभाव आणि परिणाम निर्माण झाला.