Richest Families In The World: जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये Walton ठरले अव्वल; Ambani Family ला पहिल्या दहा मध्ये स्थान, See List

म्हणूनच जगातील 25 श्रीमंत कुटुंबांच्या (25 Richest Families) संपत्तीत या वर्षी 22 टक्के वाढ झाली आहे

Mukesh Ambani (Photo Credits: File Image)

शेअर बाजारात सतत तेजी, अनुकूल कर धोरण अशा अनेक कारणांमुळे जगातील श्रीमंत अजूनच श्रीमंत होत आहे, तर गरिबांची गरिबी वाढत आहे. म्हणूनच जगातील 25 श्रीमंत कुटुंबांच्या (25 Richest Families) संपत्तीत या वर्षी 22 टक्के वाढ झाली आहे. या 25 कुटुंबांची एकूण संपत्ती 1.7 ट्रिलियन डॉलर झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, गेल्या एका वर्षात या घराणेशाहीच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. तर, जर या 25 कुटुंबांच्या मालमत्ता एकत्र केल्या तर त्या पैशाने फक्त एकच नाही तर अनेक देश विकत घेता येतील.

या 25 श्रीमंत कुटुंबांमध्ये पहिल्या स्थानावर आहे The Walton Family. चार वर्षांपासून हे या यादीत पहिल्या स्थानावर आहेत आणि त्यांची संपत्ती 238.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे. गेल्या 12 महिन्यांत त्यांच्या संपत्तीत 23 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

दुसऱ्या स्थानावर Mars कुटुंब आहे, ज्यांची संपत्ती 141.9 अब्ज डॉलर आहे. तिसऱ्या स्थानावर Koch कुटुंब असून, त्यांची संपत्ती 124.4 अब्ज डॉलर इतकी आहे. चौथ्या क्रमांकावर Hermes आहेत, ज्यांची संपत्ती 111.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे. पाचव्या स्थानावर Al Saud कुटुंब असून त्यांची संपती 100,000 मिलिअन डॉलर्स इतकी आहे. त्याचबरोबर भारतामधील अंबानी कुटुंब सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांची संपत्ती 93.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

सातव्या स्थानावर Wertheimer कुटुंब असून त्यांची संपती, 61.8 अबंज डॉलर्स आहे. Johnson कुटुंब 61.2 अब्ज डॉलर्ससह आठव्या क्रमांकावर आहे. नवव्या स्थानावर Thomson कुटुंब असून, त्यांची संपती 61.1 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि दहाव्या स्थानावर Boehringer कुटुंब असून, त्यांची संपती 59.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे. (हेही वाचा: Bitcoin In El Salvador: अधिकृत मान्यता मिळाल्यावर एल साल्वाडोर देशात बिटकॉईन करन्सीची कशी आहे स्थिती? घ्या जाणून)

जर आपण या 25 कुटुंबांच्या मालमत्तेची तुलना केली तर असे फक्त 9 देश आहेत ज्यांचा जीडीपी या कुटुंबांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा जास्त आहे. या देशांमध्ये अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, भारत, यूके, फ्रान्स, ब्राझील, इटली यांचा समावेश आहे. याखेरीज सर्व देश त्यांच्यापेक्षा खूप मागे आहेत. याशिवाय, ही 25 कुटुंबे मिळून कॅनडा, रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्पेन, मेक्सिको, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशांना ताब्यात घेऊ शकतात.