RBI कडून 200 आणि 500 च्या नव्या नोटा लवकरच चलनात; पहा काय आहे नव्या नोटांची खासियत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 200 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) लवकरच 200 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. या नव्या नोटांवर आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. जुन्या आणि नव्या 500 च्या नोटांवर हाच एक विशेष फरक असणार आहे. मात्र पूर्वीपासून चलनात असणाऱ्या 500 रुपयांच्या नोटा कायदेशीररीत्या सुरु राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसंच महात्मा गांधी सिरीज आणि गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांच्या स्वाक्षरी असलेल्या नव्या नोटा लवकरच जारी करण्यात येतील. (RBI लवकरच चलनात आणणार 20 रुपयांची नवीन नोट)
या नव्या नोटांची डिझाईन महात्मा गांधी सिरीजमधील 500 रुपयांच्या नोटांप्रमाणेच असेल. त्याचबरोबर 200 रुपयांच्या नव्या नोटा देखील आरबीआय लवकरच चलनात आणणार आहे. महात्मा गांधी सिरीजमधील या नोटांवर देखील गर्व्हनर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. या नव्या नोटांची डिझाईन देखील महात्मा गांधी सिरीजमधील नोटांप्रमाणेच असेल. महात्मा गांधी सिरीजमधील नव्या 500 रुपयांच्या नोटांचा रंग ग्रे असेल. तर 66mm x 150mm इतकी नोटेची साईज असेल. (लवकरच चलनात येणार डिजिटल नोटा; ही असेल नोटांची खासियत)
500 रुपयांच्या नव्या नोटांची खासियत:
समोरील बाजू
नोटेवर 500 असा पारदर्शी अंक दिसेल.
देवनागरीत देखील 500 असा अंक दिसेल.
नोट टिल्ट केल्यानंतर नोटेचा रंग हिरव्यावरुन निळा होईल.
क्लॉज, गर्व्हनरची स्वाक्षरी याची जागा नव्या नोटेवर उजव्या बाजूला असेल.
नोटेवर व्हॉटरमार्क असेल.
अशोकस्तंभ नोटेच्या उजव्या बाजूला असेल.
मागील बाजू
प्रिटिंग ईअर नोटेच्या मागील बाजूस डावीकडे दिला असेल.
स्वच्छ भारत लोगो घोषवाक्यासह असेल.
मध्यभागी भाषा पॅनल असेल.
लाल किल्लाचे चित्र आणि भारताचा झेंडा नोटेच्या मागील बाजूस असेल.
उजव्या बाजूला देवनागरीत 500 हा अंक लिहिलेला असेल.
200 रुपयांच्या नव्या नोटांची खासियत:
समोरील बाजू
नोटेवर 200 असा पारदर्शी अंक दिसेल.
देवनागरीत देखील 200 असा अंक दिसेल.
मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र असेल.
छोट्या अक्षरात- ‘RBI’, ‘भारत’, ‘India’ आणि ‘200’असे लिहिलेले असेल.
नोट टिल्ट केल्यानंतर नोटेचा रंग हिरव्यावरुन निळा होईल.
क्लॉज, गर्व्हनरची स्वाक्षरी याची जागा नव्या नोटेवर उजव्या बाजूला असेल.
रुपयांचे चिन्ह, 200 हा अंक खाली उजव्या बाजूला असून त्याचा रंग हिरव्यावरुन निळा असा बदलेल.
अशोकस्तंभ नोटेच्या उजव्या बाजूला असेल.
नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आणि 200 असा व्हॉटरमार्क असेल.
मागील बाजू
प्रिटिंग ईअर नोटेच्या मागील बाजूस डावीकडे दिला असेल.
स्वच्छ भारत लोगो घोषवाक्यासह असेल.
देवनागरीत 200 हा अंक लिहिलेला असेल.
काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेकडून 50 रुपयांची नवी नोट सादर करण्यात आली. यावर देखील गर्व्हनर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी आहे. ही देखील महात्मा गांधी सिरीजमधील नोट असून त्याचा रंग हिरवा असणार आहे.