1जुलैपासून NEFT आणि RTGS च्या माध्यमातून होणार्या व्यवहारांवर System Charges नाही; आरबीआय चे बॅंकांना आदेश
NEFT च्या माध्यमातून 2 लाख रूपये तर RTGS च्या माधयमतून 2 लाखापलिकडीलही व्यवहार डिजिटल माध्यमातून करता येऊ शकतात.
1 जूनपासून ऑनलाईन माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणार्यांना वेळेमध्ये वाढ केल्यानंतर आता त्याचे सेवा शुल्कदेखील माफ केले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आता बॅंकांना NEFT आणि RTGS च्या माध्यमातून होणार्या देवाणघेवाणीवर शुल्क न आकारण्याचे आदेश दिले आहेत.
डिजिटल माध्यमातून व्यवहार वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता NEFT आणि RTGS ने व्यवहार करणं अधिक सुलभ होणार आहे. तसेच बॅंकांनाही डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आदेश दिले आहेत. NEFT च्या माध्यमातून 2 लाख रूपये तर RTGS च्या माधयमतून 2 लाखापलिकडीलही व्यवहार डिजिटल माध्यमातून करता येऊ शकतात. RTGS च्या वेळेत बदल, 1 जून पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करू शकणार पैसे ट्रान्सफर
ANI Tweet
NEFT आणि RTGS प्रमाणेच एटीएम चार्जेसदेखील टाळण्यासाठी मागणी जोर धरत आहे. त्यानुसार या मागणीचाही विचार केला जात आहे असे संकेत दिले आहेत. पुढील काही महिन्यात त्याचा अहवाल सादर होणार आहे.