Religious Conversion Case: 'मोबाईल गेम'च्या आधारे महाराष्ट्रात 400 जणांच धर्मांतर? गाझियाबाद पोलिसांच्या गौप्यस्फोटामुळे राज्यात खळबळ
गाझियाबादमधल्या धर्मांतराला महाराष्ट्र कनेक्शन आहे. कारण यातील एक आरोपी शाहनवाज मकसूद खान हा ठाण्याच्या मुंब्र्यातील असल्याचं समोर आले आहे.
गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन गेमच्या सहाय्यानं महाराष्ट्रात 400 जणांचं धर्मांतर केल्याचा गौप्यस्फोट गाझियाबाद सहाय्यक पोलिस आयुक्तांनी केला आहे. विशेष म्हणजे गाझियाबादमधल्या या धर्मांतराचं महाराष्ट्रातील मुंब्र्याशी असणारे कनेक्शन समोर आलंय. मुंब्र्यात 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं हा गौप्यस्फोट केल्याचं डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलंय. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दुसरा आरोपी शाहनवाज फरार आहे. गाझियाबाद पोलीस शाहनवाजची आई मुमताजचा जबाब मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याची शक्यता आहे. मोबाईल गेमच्या नावाखील धर्मांतर करण्याचं प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केलं. ही एक मोठी टोळी असून ती ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात या मुलांना हरवलं जातं, मग त्यात फसवलं जातं आणि पुढे त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केले जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुस्लिम मुलं गैर-मुस्लिम नावाने प्रोफाईल बनवून गेम खेळायची. ही टोळी गेम खेळणाऱ्यांना हरवून त्यांना कुराण पठण करायला लावायची आणि जाणूनबूजून जिंकवायची अशा प्रकारे तरुणांचे ब्रेन वॉश केले जात असे.
गाझियाबादमधल्या धर्मांतराला महाराष्ट्र कनेक्शन आहे. कारण यातील एक आरोपी शाहनवाज मकसूद खान हा ठाण्याच्या मुंब्र्यातील असल्याचं समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहनवाज खान 31 मे पासूनच फरार आहे. त्याआधी त्याने त्याच्या कुटुंबियांना सोलापूरला शिफ्ट केलं. तर 1 जूनला गाझियाबाद पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क करुन त्यांची मदत मागितली पण तोपर्यंत उशीर झाला होता.
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2023 11:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

