R-Surakshaa Vaccination Programme: रिलायंस 1मे पासून त्यांच्या कर्मचारी व कुटुंबियांसाठी राबवणार स्वतंत्र लसीकरण मोहिम
यामध्ये रिलायंस त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी लसीकरण करणार आहेत.
भारतामध्ये दुसर्या कोविड 19 च्या लाटेची तीव्रता पाहता आता सरकारने 1 मेपासून सरसकट 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. यामध्ये आता रिलायंस (Reliance Industries) कडून आता एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. रिलायंस भारताच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये सहभागी होत R-Surakshaa हा रिलायंसकडून स्वतंत्र उपक्रम राबवणार आहेत. यामध्ये रिलायंस त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी लसीकरण करणार आहेत. रिलायंसची ही स्वतंत्र लसीकरण मोहिम त्यांच्या सर्व लोकेशनवर राबवली जाणार आहे. आजच त्याबाबतचं एक परिपत्रक जारी करत रिलायंसने माहिती दिली आहे.
भारतामध्ये दिवसागणिक कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काल आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांट काल भारतामध्ये जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्णांची आकडेवारी समोर आली आहे. काल पहिल्यांदाच 3 लाखांच्या पार कोरोनाबाधित रूग्ण समोर आले होते.
सध्या भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत असताना भविष्यातील धोका रोखण्यासाठी लसीकरण वेगवान करण्याकडे सरकारचे लक्ष आहे. यामध्ये कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्फुटनिक वी या तीन लसींना सध्या मान्यता देण्यात आली आहे. पण देशाची लोकसंख्या पाहता आता परदेशी लसी देखील भारतात उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशी देखील मागणी जोर धरत आहे.
भारतात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींच्या 13 कोटी 54 लाख 78,420 मात्रा देण्यात आल्या. यामध्ये लशीची पहिली मात्रा घेतलेल्या सुमारे 92 लाख, तर दुसरी मात्रा घेतलेल्या 59 लाखहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काल दिवसभरात 31,47,782 जणांना लस देण्यात आली