दहा रुपयांचे नाणे वैध! आरबीआयने 14 प्रकारच्या नाण्यांबाबत दिले स्पष्टीकरण

वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असलेली ही सर्व नाणी अधिकृत असून, त्याबाबत कोणताही संशय बाळगण्याचे काहीच कारण नाही.

Rs 10 Coin (Photo Credits: Pixabay)

All the coins of 10 rupees are valid: दहा रुपयांचे नाणे (Rs 10 coin) हे वैध असून त्याबाबत कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट केले आहे. 10 रुपयांची नाणी खोटी असल्याची अफवा पसरल्याने देशातील काही प्रदेशांमध्ये ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या 10 रुपयांच्या नाण्याबद्धल बराच गोंधळ सुरु होता. अखेर आरबीआयने याबाबत स्पष्टीकरण देऊन या गोंधळावर पडदा टाकला आहे.

दहा रुपयांच्या नाण्याबाबत अधिक माहिती देताना आरबीआयने म्हटले आहे की, सध्या बाजारात आरबीआयद्वारा अधिकृत असलेली 10 रुपयांची विविध डिझाईनची एकूण 14 नाणी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असलेली ही सर्व नाणी अधिकृत असून, त्याबाबत कोणताही संशय बाळगण्याचे काहीच कारण नाही. ही माहिती देण्यासाठी आरबीआयने एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे. जे तुम्ही आरबीआयचे अधिकृत संकेतस्थळ www.RBI.org,in वर पाहू शकता. (हेही वाचा, शिवरायांच्या नाण्याला जपानमध्ये मानाचे स्थान; द इंटरनॅशनल कॉइन डिझाईन कॉम्पिटिशन 2018मध्ये पुरस्काराने सन्मानीत)

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आरबीआयची 10 रुपयांची सर्वच्या सर्व 14 ही नाणी ही अधिकृत आहेत. ही नाणी देशभरातील सर्व बँकांमध्ये स्वीकारली जातात. स्वीकारणे बंधनकारक आहे. ही नाणी स्वीकारली गेली नाहीत तर ते कायद्याविरोधात आहे. असा प्रकार आढळल्यास तो निदर्शनास आणावा असे अवाहनही आरबीआयने केले आहे.