RBI चं पतधोरण जाहीर, रेपो रेट ते महागाई दर याबद्दल पहा रिझर्व्ह बॅंकेकडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा
त्यामुळे आता हा रेपो रेट (REPO Rate) 5.15% वर कायम राहणार आहे.
RBI Monetary Policy December 2019: 'रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया' (Reserve Bank of India) कडून आज पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. मागील 5 महिन्यांपासून सातत्याने आरबीआयकडून रेपो रेट मध्ये कपात करण्यात आली होती. मात्र आजच्या डिसेंबर महिन्यातील जाहीर केलेल्या रेपो रेटमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता हा रेपो रेट (REPO Rate) 5.15% वर कायम राहणार आहे. दरम्यान व्याजदरात या महिन्यातही कपात होईल अशी अपेक्षा होती मात्र तसे झालेले नाही. सोबतच रिव्हर्स रेपो रेट देखील 4.90% वर कायम आहे. त्यामुळे कर्जदारांचे व्याजदर कायम राहणार आहेत.
आर्थिक वर्ष 2019-20 मधील दुसर्या तिमाहीत सुमारे 5% ने खाली आलेला विकास दर, वाढलेला महागाई दर हे पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये दर कपात होण्याचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. तर जीडीपी देखील 6.1% वरून 5% वर आला आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीसाठी महागाई दर 5.1% राहील, असाअंदाज बँकेने वर्तवला आहे. दरम्यान ओला दुष्काळ असल्याने सध्या भाजीपाल्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर चढे आहेत. ते पुढील काही दिवस कायम राहण्याचे चित्र आहे.
ANI Tweet
आरबीआयने जाहीर केलेल्या आजच्या पतधोरणाचा परिणाम आता शेअर बाजारावरही पाहता येणार आहे. रेपो रेटमध्ये कपात न झाल्याने सेनेक्स , निफ्टी कमी झाल्याची पहायला मिळाली आहे. आज सकाळी शेअर बाजार उघताच सेन्सेक्स 69 अंकांच्या तेजीसह 40 हजार 920 अंकांवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 16 अंकांनी वधारून 12 हजार अंकांवर आला होता.