Axis Bank वर RBI ची दंडात्मक कारवाई; 'या' कारणांसाठी ठोठावला 25 लाखांचा दंड
केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने अॅक्सिस बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
केवायसी नियमांचे (KYC Rules) उल्लंघन केल्याप्रकरणी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) अॅक्सिस बँकेला (Axis Bank) 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाची घोषणा सेंट्रल बँकेकडून 1 सप्टेंबर रोजी करण्यात आली. रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने नेमून दिलेल्या केवायसी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती आरबीआय (RBI) ने दिली. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट (Banking Regulation Act) 1949 च्या सेक्शन 47A (1) (C) आणि सेक्शन 46 (4) (i) या सेक्शन अंतर्गत आरबीआयकडून अॅक्सिस बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. (Axis Bank च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! खात्यातून पैसे काढणे आणि SMS च्या शुल्कात वाढ)
आरबीआयने ठरवून दिलेले नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेने त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या व्यवहाराचा या कारवाईशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण आरबीआयकडून देण्यात आले आहे. आरबीआयकडून फेब्रुवारी 2020 आणि मार्च 2020 दरम्यान बँकांच्या तपासणी करण्यात आली होती. आरबीआयने नमूद केलेले नियम अॅक्सिस बँकेकडून पाळले जात नसल्याचे यात निर्दशनास आले. (RBI चा बॅंकांना दणका; 1 ऑक्टोबर पासून ATM मध्ये नोटा नसल्यास होणार दंडाची कारवाई)
ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये होणारे ट्रॅक्जॅक्शन्स बद्दल ग्राहकांना अपडेट करण्यास आणि मॉनिटर करण्यास अॅक्सिस बँक असमर्थ राहिली आहे. या सर्व पडताळणीनंतर बँकेला कारणे द्या नोटीस पाठवण्यात आली होती. आरबीआयकडून बँकेला दंड का ठोठावला जावू नये, असा सवाल यात विचारण्यात आला होता. आरबीआयच्या या नोटीसला बँकेने दिलेले उत्तर आणि सुनावणीत बँकेकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण न पटल्यामुळे आरबीआयकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.