कोरोना व्हायरस संकटादरम्यान म्युचल फंड्सवरील Liquidity Pressure कमी करण्यासाठी RBI कडून 50,000 कोटींची Special Liquidity Facility जाहीर
आज भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून म्युचल फंड्स साठी 50 हजार कोटी रूपयांची विशेष लिक्विडीटी सुविधा जाहीर केली आहे.
कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. अशामध्ये आता म्युचल फंडवर असलेलं liquidity pressures कमी करण्यासाठी आज भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून म्युचल फंड्स साठी 50 हजार कोटी रूपयांची विशेष लिक्विडीटी सुविधा जाहीर केली आहे. दरम्यान कोरोनाच्या संकटामध्ये आर्थिक व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी सार्या आवश्यक उपाय योजनांची पूर्ती केली जाईल अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान मागील मागील आठवड्यात भारतातील आठवी सगळ्यात मोठी म्युचल फंड कंपनी फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युचल फंडने कोरोना व्हायरस संकटामध्ये त्यांच्या सहा म्युचल फंड योजना गुंडाळल्या आहेत. दरम्यान यावेळेस त्यांनी लिक्विडीटी प्रेशरचं कारण देत म्युचल फंड्स बंद करत असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये फ्रैंकलिन इंडिया लो ड्यूरेशन फंड, फ्रैंकलिन इंडिया डायनेमिक एक्यूरल फंड, फ्रैंकलिन इंडिया क्रेडिट रिस्क फंड, फ्रैंकलिन इंडिया शॉर्ट टर्म इनकम प्लान, फ्रैंकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बॉन्ड फंड आणि फ्रैंकलिन इंडिया इनकम अपॉर्चुनिटीज फंड यांचा समावेश होता. Coronavirus Lockdown: कर्जाच्या हफ्तांच्या वसुलीला 3 महिने स्थगिती देण्याचा RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा बॅंकांना सल्ला
RBI Tweet
स्पेशल लिक्विडीटी फंड एमएफच्या अंतर्गत आरबीआयने फिक्स रेपो रेट वर 90 दिवसांसाठी एक रेपो ऑपरेशन सुरू केलं आहे. एसएलएफ-एमएफ ऑन-टॉप आणि ओपन-एंडेड आहेत. ही सुविधा 27 एप्रिल पासून 11 मे 2020 पर्यंत सुरू राहील. दरम्यान भविष्यात आर्थिक घडामोडींचा आढावा घेऊन कालमर्यादा आणि रक्कमेबद्दल वाढ करण्यावर आरबीआय विचार करू शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)