RBI 20 एप्रिल पासून सुरु करणार Sovereign Gold Bond Scheme; आता घरबसल्या करता येणार सोनेखरेदी, 'या' स्कीम विषयी वाचा सविस्तर

ही स्कीम म्हणजेच नागरिकांना प्रत्यक्ष सोन्याचे वस्तूऐवजी बॉण्ड मध्ये पैसे गुंतवता येणार आहेत. या

Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  धोका रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी आज पासून 3 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) घोषित केले आहे. सोबतच ज्या भागात कमी कोरोना रुग्ण आहेत त्याठिकाणी 20 एप्रिल पासून काही नियम शिथिल करण्यात येतील असेही मोदींनी सांगितले. या लॉक डाऊन काळात लोकांना गुंतवणूक करण्यासाठी एक नवी स्कीम स्वतः मोदी सरकार घेऊन येत आहेत. येत्या 20 एप्रिल पासून रिझर्व्ह बँक (RBI) आणि केंद्र सरकारच्या विद्यमाने सॉव्हेन गोल्ड बाँड स्कीम 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme) लागू करण्यात येईल असे समजतेय. ही स्कीम म्हणजेच नागरिकांना प्रत्यक्ष सोन्याचे वस्तूऐवजी बॉण्ड मध्ये पैसे गुंतवता येणार आहेत. यामुळे तुम्ही घरबसल्या गुंतवणूक करू शकाल तसेच व्यवसायात देखील वृद्धी येईल अशी अपेक्षा आहे. या स्कीम विषयी सविस्तर जाणून घ्या. Coronavirus Lockdown: देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा नोकरदारांना आणि करदात्यांना 'या' 5 निर्णयात दिलासा

सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड स्कीम विषयी महत्वाची माहिती

>> सॉव्हरेन गोल्ड खरेदी करण्यासाठी पहिला टप्पा 20 ते 24 एप्रिल दरम्यान असणार आहे. २ सप्टेंबर पर्यंत ही स्कीम सहा टप्प्यात राबवली जाणार आहे.

>> यामध्ये सर्वात कमी म्हणजेच 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक सुद्धा करता येइल.

>> गुंतवणूक करताना एक व्यक्ती एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकेल.

>> या गुंतवणुकीमुळे तुम्हाला करात सवलत तसेच गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.

>> आठ वर्षापर्यंत ही गुंतवणूक असेल तसेच पाच वर्ष पूर्ण झाल्यावर ग्राहक बॉण्ड मधून बाहेर पडू शकतील.

>> Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होईल.

>> यासाठी ऑनलाईन अर्ज आणि खरेदीचे पेमेंट करण्याची मुभा आहे असे केल्यास किमतीवर 50 रुपयांची सूट दिली जाणार आहे.

दरम्यान, यंदा 26 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. दरवर्षी यानिमित्ताने सोने बाजारात बरीच झळाळी दिसून येते. यंदा मात्र कोरोनाचे संकट असल्याने लोकांना घरी राहणे भाग असणार आहे अशावेळी सोने गुंतवणुकीतीलच सुरक्षित पर्याय म्हणून या योजनेचा विचार करता येईल.