दहा वर्षावरील अल्पवयीय बॅंकेचे खातेदार आता स्वतंत्रपणे व्यवहार करू शकतात; RBI ने जारी केला निर्णय
रिझर्व्ह बँकेने बँकांना 1 जुलै 2025 पर्यंत सुधारित मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत करण्यासाठी नवीन धोरणे बनवण्यास किंवा विद्यमान धोरणांमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे.
आरबीआय (RBI) कडून आता देशामध्ये 10 वर्षावरील पण अल्पवयीन असलेल्यांना बॅंक अकाऊंट्स स्वतंत्रपणे हाताळण्याची परवानगी दिली आहे. आरबीआय कडून नुकताच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, मायनर्स (Minors) आता त्यांचं सेव्हिंग अकाऊंट (Savings Bank Account) आणि टर्म डिपॉझिट अकाऊंट (Term Deposit Accounts) स्वतंत्रपणे हाताळू शकतात.
"कमीत कमी 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि बँकांनी त्यांच्या जोखीम व्यवस्थापन धोरणानुसार निश्चित केलेल्या रकमेपर्यंत आणि अटींपर्यंतच्या अल्पवयीन मुलांना, जर त्यांची इच्छा असेल तर, स्वतंत्रपणे savings/ term deposit accounts उघडण्याची आणि चालवण्याची परवानगी दिली जाऊ शकते आणि अशा अटी खातेधारकांना योग्यरित्या कळवल्या जातील," असे आरबीआयने परिपत्रकात म्हटले आहे.
आरबीआयच्या सूचनेत दिलेल्या माहितीनुसार,अल्पवयीन मुले प्रौढ झाल्यानंतर, नवीन ऑपरेटिंग सूचना आणि खातेधारकाच्या स्वाक्षरीचा नमुना बँकेच्या रेकॉर्डवर ठेवणे आवश्यक असेल. RBI ने बँकांना त्यांच्या जोखीम व्यवस्थापन धोरणाच्या आधारे अल्पवयीन खात्यांना अतिरिक्त बँकिंग सुविधा देण्याची परवानगी देण्याचीही परवानगी दिली. High Quality Counterfeit ₹500 Notes: सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फिरत आहेत 500 रुपयांच्या बनावट नोटा; केंद्र सरकारने जारी केला इशारा, जाणून घ्या खऱ्या-खोट्या नोटांची ओळख कशी कराल .
अल्पवयीन खातेदार 10 वर्षापेक्षा कमी असल्यास काय?
जर एखादा अल्पवयीन खातेदार 10 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर तो त्यांचे बँक खाते उघडू शकतो, परंतु व्यावसायिक आणि सहकारी बँकांना दिलेल्या परिपत्रकानुसार, ते व्यवहार त्याच्या नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकाद्वारे करू शकतात.
10 वर्षांखालील अल्पवयीन मुलांनाही त्यांच्या आईला पालक म्हणून ठेवून अशी बँक खाती उघडण्याची परवानगी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)