Tejaswi vs Tej Pratap In Bihar: राष्ट्रीय जनता दल पक्षात पुन्हा एकदा तेजस्वी विरुदध तेजप्रताप, सुप्रीमो लालू प्रसाद यादव कोणाच्या बाजूने?
लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षात पुन्हा एकदा तेजस्वी यादव विरुदध तेजप्रताप यादव असा दोन बंधुंमध्ये सामना रंगला आहे. मुळात लालू प्रसाद यादव हे काणत्या पूत्राच्या पाठी ठामपणे उभे राहतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. लालू प्रसाद यादव यांचे उत्तराधीकारी कोण? यावरुन दोन्ही बंधुंमध्ये वाद सुरु आहे.
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav ) यांच्या राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षात पुन्हा एकदा तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) विरुदध तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) असा दोन बंधुंमध्ये सामना रंगला आहे. कारागृहातून जामीनावर बाहेर आलेले आणि रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज मिळालेले लालू प्रसाद यादव आता या दोन भावांमधील अंतर्गत कलह कसा सोडवतात याकडे अवघ्या बिहारचे लक्ष लागले आहे. मुळात लालू प्रसाद यादव हे काणत्या पूत्राच्या पाठी ठामपणे उभे राहतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. लालू प्रसाद यादव यांचे उत्तराधीकारी कोण? यावरुन दोन्ही बंधुंमध्ये वाद सुरु आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी यांनी तेजप्रताप यादव यांच्याबाबत 'ते कोण आहेत' असा सवाल उपस्थित केल्यामुळे वाद आणखी चिघळला आहे. याशिवाय जगदानंद सिंह यांनी तेजप्रताप यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणाऱ्या आकाश यादव यांना राजदच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदावरुन हटवले आहे. त्यामुळे प्रकरण अधिक तापले आहे.
जगदानंद सिंह यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करत लालू प्रसाद यादव यांनीही त्यांना काहीशी सूट दिली आहे. कारण बिहारमधील कोणत्याही वर्गाला लालू सध्यातरी नाराज करु इच्छित नाहीत. तेजप्रताप यादव यांनी ज्या पद्धतीने आपल्या वक्तव्यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांना अपमानित केले होते. तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती लालू प्रसाद यादव टाळू पाहात आहेत. दरम्यान, तेजप्रताप यादव मात्र ट्विटरच्या माध्यमातून बंधुंवर हल्लाबोल केला आहे. तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे की, एखाद्या तात्पूरत्या सल्लागाराचा सल्ला घेताना अध्यक्ष (पक्षाचे) हे विसरले आहेत की पक्ष लोकशाहीप्रमाणे चालतो. राष्ट्रीय जनता दलाचे संविधान सांगते की, कोणत्याही प्रकारचे नोटीस न देता पक्ष कोणत्याही पक्षाला पदमुक्त करु शकत नाही. याच ट्विटमध्ये तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे की, आज जे झाले ते राजदच्या घटनेविरुद्ध झाले आहे.
दुसऱ्या बाजूला आकाश यादव प्रकरणात बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी प्रतिक्रिया देत आपेक्षा व्यक्त केली आहे की, पक्षात सुरु असलेला कलह लवकरच शांत होईल. तेजस्व यांना विचारण्यात आले होते की, त्यांचे मोठे बंधून तेज प्रताप यादव नाराज आहेत? यावर तेजस्वी यादव यांनी म्हटले की, आम्ही असताना तुम्हील लोक का चिंता करत आहात? आम्ही आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सर्व काही ठिक होईल.
दरम्यान, राजदमधील कलहावर राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याकडून अद्याप तरी कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांचे मौन नेमके काय सांगते हा प्रश्न पक्ष कार्यकर्त्यांना पडला आहे. दरम्यान, तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यातील संघर्ष आता बिहारी जनतेला नवा राहिला नाही. या आधीही दोन्ही बंधूंमध्ये अनेकदा संघर्ष झाल्याचे बिहारी जनतेने पाहिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)