Ramayana Circuit Train: भगव्या गणवेशावरुन 'रामायण'; साधुसंतांच्या आक्षेपानंतर उपरती; IRCTC कडून ड्रेसकोड बदलल्याची माहिती
त्यानंतर साधूसंत आणि धार्मिक विचारांच्या मंडळींकडून टीकेची एकच झोड उडाली. मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर एक पाऊल मागे घेत रामायण एक्सप्रेस (Ramayana Express) मध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सचा पोशाख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये (Ramayana Circuit Train) वटर्स भगवी वस्त्रे परिधान करुन सेवा देताना दिसले. त्यानंतर साधूसंत आणि धार्मिक विचारांच्या मंडळींकडून टीकेची एकच झोड उडाली. मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर एक पाऊल मागे घेत रामायण एक्सप्रेस (Ramayana Express) मध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सचा पोशाख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. IRCTC ने सोमवारी संध्याकाळी ट्विट माहिती दिली. या ट्विटमध्ये रामायण एक्सप्रेसमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सचा ड्रेसकोड (Dress Code) बदलण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय आयआरसीटीसीने नव्या गणवेशातील वेटर्सचे फोटो शेअर करत झालेला बदलही दाखवला आरे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ट्रेनमध्ये भगव्या कपड्यातील काही लोक भांडी उचलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ अयोध्या-रामेश्वरम ट्रेनमधील असल्याचा दावा केला जात होता. दाव्यात तथ्य होते. दरम्यान, भगव्या कपड्यात भांडी उचलणारे लोक हे ट्रेनमधील वेटर्स होते. या प्रकारास उज्जैन आखाडा परिषद आणि इतरही काही साधू-संतांनी जोरदार आक्षेप घेतला होता. हा ड्रेसकोड मागे घ्या अन्यथा 12 डिसेंबरपासून सुरु होणारी पुढची गाडी थांबवली जाईल, असा इशारा देण्यात आला होता. (हेही वाचा, Aadhaar-IRCTC Linking : महिन्याला 12 रेल्वे तिकीटं बूक करण्यासाठी IRCTC सोबत लिंक करा Aadhaar; पहा irctc.co.in वर ऑनलाईन कसे कराल लिंक?)
IRCTC च्या माध्यमातून अयोध्या, चित्रकूटसह भगवान श्री राम यांच्याशी संबंधित धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी भारतीय रेल्वेने रामायण एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे. या ट्रेनच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनास चालना देणे हा हेतू आहे. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान ट्रेनमध्येच जेवण दिले जाणार आहे.