Ram Mandir Bomb Threat: राम मंदिरला बॉम्बस्फोटाची धमकी; अयोध्येतील ट्रस्टला ईमेल, सायबर पोलिसांकडून FIR दाखल
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर अयोध्येतील राम मंदिर परिसरात उच्चस्तरीय सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
अयोध्येतील राम मंदिरात बॉम्बस्फोटाची धमकी (Ram Mandir Bomb Threat) देणारा ईमेल आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ उच्चस्तरीय चौकशी (Ram Temple Security) सुरू केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला (Ram Janmbhoomi Trust) हा धमकीचा ईमेल सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. या प्रकरणात अयोध्येतील सायबर पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला असून, सायबर सेलने ईमेल पाठवणाऱ्याचा माग काढण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे अधिकारी महेश कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
अयोध्या परिसरात कडेकोट सुरक्षा
अयोध्या राम मंदिर परिसरात सुरक्षा आलेल्या धमकीनंतर अधिक कडक करण्यात आली आहे. अयोध्या, बाराबंकी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरात कसून झडती घेतली असून गस्त वाढवण्यात आली आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला आलेल्या अनामिक ईमेलमध्ये मंदिरात बॉम्बस्फोट होण्याची चेतावणी देण्यात आली होती. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून अधिकाऱ्यांनी ती गंभीरपणे घेतली आहे. (हेही वाचा, Acharya Satyendra Das Dies: अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन; ब्रेन स्ट्रोकनंतर लखनऊच्या रुग्णालयात चालू होते उपचार)
2024 मध्ये सर्वाधिक भेटी देण्यात आलेले ठिकाण
राम मंदिर हे उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोकप्रिय धार्मिक स्थळ ठरले असून, 2024 मध्ये 135.5 मिलियन देशांतर्गत पर्यटकांनी येथे भेट दिली. या संख्येने ताजमहाललाही मागे टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर, पोलिसांकडून मंदिर परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
सायबर सेलकडून तपास सुरू
सायबर सेल या धमकीच्या ईमेलचा स्त्रोत शोधण्यासाठी IP अॅड्रेस आणि डिजिटल ट्रेस तपासत आहे. ईमेल देशांतून आला की परदेशातून, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ईमेल पाठवण्यामागील हेतू आणि त्याची सत्यता याची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)