Raksha Bandhan 2021:  रक्षाबंधन निमित्त राखी पाठवायची आहे? टपाल विभागाने मेल पोस्‍टसाठी केली विशेष व्यवस्था
Image used for representational purpose | (Photo Credits: File)

यंदा 22 ऑगस्ट 2021 ला राखीपौर्णिमा आहे. या प्रसंगी पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी आणि या टपालाच्या सुरळीत वितरणासाठी टपाल विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. टपाल खात्याच्या दिल्ली मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतून इतर राज्यांमध्ये पोस्टाने पाठविल्या जाणाऱ्या राख्यांसाठी 16 ऑगस्ट 2021 पर्यंत आणि दिल्ली मंडळात पाठविल्या जाणाऱ्या राख्यांसाठी 17 ऑगस्ट 2021 पर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

दिल्लीतील 34 महत्त्वाच्या टपाल कार्यालयांमध्ये आणि दिल्ली रेल्वे स्थानक आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानक या 2 आरएमएस अर्थात रेल्वे टपाल सेवा कार्यालयांमध्ये विशेष टपाल काऊंटर उभारण्यात येत आहेत.

1. Ashok Vihar HPO -1 10052 19. New Delhi GPO- 1 10001
2. Civil Lines PO - 110054 20. New SubziMandi PO - 110033
3. Chankyapuri PO - 1 10021 21. Naraina Ind. Estate HPO- 1 10028
4. Delhi GPO- 110006 22. Patel Nagar PO -110008
5. Delhi Cantt.PO-110010 23. PaschimVihar PO - 110063
6. HauzKhas PO- 110016 24. Ramesh Nagar HPO -110015
7. Indraprashta HO -1 10002 25. Rohini Sector-7 PO- 110085
8. Janakpuri PO - 1 10058 26. R K. Puram Sector-5 PO -110022
9. Krishna Nagar HPO- 110051 27. R.P. Bhawan PO - 110004
10. Karol Bagh PO- 110005 28. Sansad Marg HPO - 110001
11. Keshav Puram/Onkar Nagar PO- 110035 29. Sarojini Nagar HPO - 1 10023
12. Kalkaji HPO- 110019 30. SRT Nagar PO -1 10055
13. Lodi Road HPO -110003 31. Seelampur PO- 110053
14. Lajpat Nagar PO-110024 32. Sriniwaspuri PO-1 10065
15. Malviya Nagar PO- 110017 33. SaraswatiVihar PO- 110034
16. MaikaGanj PO- 110007 34. R K. Puram (Main) PO -1 10066
17. Mehrauli PO- 110030 35. Delhi Railway Station, Transit Mail Office - 110006
18. Mayapuri PO-110064 36. New Delhi Railway Station Transit Mail Office - 110001

त्याचबरोबर शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत राख्या पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.