Ram Mandir: 'राम मंदिरामध्ये राजीव गांधी यांचे योगदान, नरेंद्र मोदी यांनी काहीही केले नाही' भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याकडून घरचा आहेर

हा व्हिडिओ टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीतील संपादित अंश असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्येच सुब्रह्मण्यम स्वामी हे विधान करताना दिसतात.

Subramanian Swamy And Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images

खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी भाजपला चांगलाच घरचा आहेर दिला आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिर (Ram Temple Case) प्रकरणातील श्रेय माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांना देत खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे की, 'अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिर निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे काहीच योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी याबाबत काहीही केले नाही. जे करायची ती चर्चा आम्हीच केली आहे', असे स्वामी यांनी म्हटले आहे. भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते असलेल्य सुब्रह्मण्यम स्वामी यांनीच हे विधान केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगलीच पंचायत होण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार तेजिंदर सिंह बग्गा यांनी आपल्या ट्विटह हँडलवरुन एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीतील संपादित अंश असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्येच सुब्रह्मण्यम स्वामी हे विधान करताना दिसतात. दरम्यान, तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत माहिती दिली नाही. परंतू, व्हिडिओसोबत लिहिलेल्या मजकूरात त्यांनी स्वामी यांच्यावर टीका करत ते रंग बदलणारा सरडा असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, अमित शाह यांच्या टेबलवर फाईल, सोनिया - राहूल गांधी यांची नागरिकता धोक्यात: भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचा दावा)

काय म्हणाले सुब्रह्मण्यम स्वामी

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्या येथील राम मंदिर उभारणीत कोहीही योगदान नाही. सरकारमध्ये असतानाही त्यांनी याबाबत कोणतेही योगदान दिले नाही. राम मंदिर उभारणीबाबतचे पहिले श्रेय माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना जाते. त्यानंतर इतरांना.', असेही स्वामी या व्हिडिओत बोलताना दिसतात.

कोरोना व्हायरस संकट कायम असतानाही अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. राम मंदिर भूमिपूजनाच्या वेळेबाबत (कोरोना संकटाच्या पार्शभूमीवर) विरोधकांकडून जोरदार टीका होत असतानाच सुब्हह्मण्यम स्वामी यांचे हे विधान पुढे आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांची चांगलीच पंचायत झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif