Tantrik Fraud: मास्तरने नोकरीत कमावले, तांत्रिकाच्या नादाने गमावले; बायकोची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
तांत्रिकासोबत झालेल्या भेटीनंतर केलेल्या अनेक उपाययोजनांमध्ये शिक्षक आर्थिक दृष्ट्या इतका गाळात गेला की, त्याला चक्क आपल्या दोन मालमत्ता (Property) गमवाव्या लागल्या.
Tantrik Fraud Case in Jodhpur: राजस्थान येथील एका शिक्षकाने घरगुती कटकट (Domestic Dispute) आणि त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी एका तांत्रिकाशी संपर्क केला. तांत्रिकासोबत झालेल्या भेटीनंतर केलेल्या अनेक उपाययोजनांमध्ये शिक्षक आर्थिक दृष्ट्या इतका गाळात गेला की, त्याला चक्क आपल्या दोन मालमत्ता (Property) गमवाव्या लागल्या. शिक्षकाच्या पत्नीला या फसवणूक आणि प्रकरणाबद्दल कळताच तिने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत तपाससुरु केला आहे. काय आहे प्रकरण घ्या जाणून.
तांत्रिकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजस्थान राज्यातील शिक्षकाची पत्नी 52 वर्षीय सुषमा देवडा यांनी यांनी दिलेल्या तक्रारीत, कालू खान नावाचा तांत्रिक आणि त्याचा मुलगा अब्दुल कादिर यांच्यासह चार जणांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना साधारण पाठिमागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये घडली आहे. (हेही वाचा, Lesbian Lover सोबत राहण्यासाठी लिंग बदलणाऱ्या महिलेची तांत्रिकाकडून हत्या; उत्तर प्रदेशातील घटना)
तांत्रिकाच्या नादाने मालमत्तांचे हस्तांतरण
फिर्यादीत असलेल्या उल्लेखानुसार, सुषमा (तक्रारदार) यांचा पती चेतनराम देवडा याने कालू खान याच्याकडे मदत मागितली. कालू खान हा परिसरात तांत्रिक म्हणून ओळखला जातो. घरगुती वाद आणि त्रासापासून सुटका हवी असल्याने मास्तर चेतनराम यांनी कालूकडे मदत मागितली. काळ्या जादू द्वारे उपाय करत असल्याचा दावा करणाऱ्या तांत्रिकाने आपल्या मुलासह चेतनरामला पटवून दिले की त्याची मालमत्ता हेच त्याच्या समस्यांचे मूळ आहे. त्यांनी त्याला 4,000 चौरस फुटांच्या मालमत्तेची मालकी कालू खानकडे हस्तांतरित करण्यास राजी केले आणि समस्यांचे निराकरण झाल्यानंतर ते परत करण्याचे आश्वासन दिले. हे हस्तांतरण जुलै 2023 मध्ये झाले. (हेही वाचा, उत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या)
मालमत्ता हस्तांतरण करुनही घरगुती वाद कायम
घरगुती वाद कायम राहिल्यावर चेतनरामने कालू खान आणि अब्दुल कादिर यांच्याकडे पुन्हा संपर्क साधून मालमत्ता परत करण्याची विनंती केली. त्यानंतर या दोघांनी असा दावा केला की हस्तांतरण पूर्ववत केल्यास कौटुंबिक मृत्यू होईल. त्यामुळे त्यांना नोव्हेंबर 2023 मध्ये अतिरिक्त 1,200 चौरस फूट मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यास पुन्हा पटवून दिले. त्यानंतर कालू खानने दोन्ही मालमत्ता बिरबल आणि राम किशोर नावाच्या व्यक्तींना 24.91 लाख रुपयांना विकल्या. या व्यवहारातून चेतनराम देवडा यांना एकही पैसा मिळाला नाही.
17 मे 2024 रोजी बिरबल आणि राम किशोर यांनी या मालमत्तेवर दावा करण्यासाठी देवडा निवासस्थानी भेट दिली तेव्हा फसवणूक उघडकीस आली. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच सुषमा देवडा यांनी चार जणांविरुद्ध मालमत्ता हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे.