Rajasthan Road Accident: ट्रेलर-बस अपघात, 11 ठार, 12 जखमी; जयपूर-आग्रा महामार्गावरील घटना

जयपूर-आगरा राष्ट्रीय महामार्गावर हन्तरा पूल नजिक बसमध्ये काही बिघाड झाला. त्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला उभी करुन त्यातील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु होता. दरम्यान, भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रेलर ट्रकने बसला पाठिमागून धडक दिली.

Rajasthan Road Accident: ट्रेलर-बस अपघात, 11 ठार, 12 जखमी;  जयपूर-आग्रा महामार्गावरील घटना
Rajasthan Road Accident | (Photo credit: ANI)

Jaipur Agra Highway Road Accident: गुजरातमधील (Gujarat) भावनगर (Bhavnagar) येथून उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मथुरेला जात असताना झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 12 जण जखमी झाले आहेत. ही घटना राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्हा हद्दीतून जाणाऱ्या जयपूर-आग्रा महामार्गावर हंत्रा गावाजवळ घडली. एका ट्रेलर वाहनाने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती भरतपूरचे एसपी मृदुल कचवा यांनी दिली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य राबवले. दरम्यान, त्यांनी पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पुढच्या काहीच वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

प्राप्त माहितीनुसार, जयपूर-आगरा राष्ट्रीय महामार्गावर हन्तरा पूल नजिक बसमध्ये काही बिघाड झाला. त्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला उभी करुन त्यातील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु होता. दरम्यान, भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रेलर ट्रकने बसला पाठिमागून धडक दिली. ज्यामध्ये बसचा चक्काचूर झाला. बसमध्ये असलेले 11 जण जागीच ठार झाले तर इतर लोक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसमधील प्रवासी हे भावनगर येथील रहिवासी आहेत. ते मधुरेला निघाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने अपघात स्थळी हजेरी लावत मदत आणि बचाव कार्य सुरु केले.

ट्विट

पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळापासून नजीकच्या अंतरावर असलेल्या लखनपूर, नदबई, हलैना, वैर गावातील स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2023 08:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).