राजस्थान नगर पालिका, नगर परिषद पोटनिवडणूक 2019 निकाल उद्या होणार जाहीर: राज्य निवडणूक आयोग

या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या (मंगळवार, 11 जून 2019) राजी पार पडणार आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

राजस्थान (Rajasthan) विधानसभा पोट निवडणूकीपूर्वी आज (सोमवार, 11 जून 2019) नगर पालिका (Nagar Palika), नगर परिषद (Nagar Parishad) पोटनिवडणूक 2019 साठी मतदान पार पडले. सकाळी 7 ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान पार पडले. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा स्थानि नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या (मंगळवार, 11 जून 2019) राजी पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाद्वारे अलवार जिल्ह्यातील बहरोड (खैरथल नगरपालिका) भरतपूर येथील वैर, भीलवाडा येथील जहाजपू, बूंदी येथील इंद्रगढ नगरपालिका, चुरु येथील सुजानगढ नगरपरिषद, छापर नगरपालिका, धौलपूर येथील बाडी, हनुमानगढ येथील रावतसर (नोहर), जयपूर येथील शाहपूरा, करौली येथील हिन्डौन (टोडाभीम), सिरोही येथील आबूरोड (श्रीगंगानगर) येथील गजसिंहपूर नगरपालिका येथे पोटनिवडणुका पार पडल्या.

येथील अलवर, भरतपुर, भीलवाड़ा, बूंदी, चूरू, धौलपुर, हनुमानगढ़, जयपूर, करौली, सिरोही आणि श्रीगंगानगर जिल्ह्यात पोटनिवडणुका पार पडत आहेत. या पोटनिवडणुकीची अधिसूचना 27 मे रोजी जाहीर झाली होती. 10 जून रोजी मतदानादिवशी मतदारसंघ परिसरातील सरकारी कार्यालयांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.