Rajasthan: अल्पवयीन मुलीवर Gang Rape, पीडितेने दिला मुलीला जन्म
तिची प्रकृती बिघडली असताना उपचार करण्याच्या बहाण्याने एका तांत्रिकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
Salumbar Gang Rape: सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे. राजस्थान राज्यातील सलुंबर येथे ही घटना घडली. पीडिता अल्पवयीन असून इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी आहे. तिची प्रकृती बिघडली असताना उपचार करण्याच्या बहाण्याने एका तांत्रिकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपी तांत्रिक हा सलुंबर पाटबंधारे विभागात शासकीय कर्मचारी म्हणून नोकरीस असल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडितेवर झालेल्या अत्याचाराची कोणालच माहिती नव्हती. मात्र, तिने बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्यावरील अत्याचाराची धक्कादायक घटना पुढे आली.
पीडितेने 6 जून रोजी बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिच्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती पुढे आली. वैद्यकीय उपचार करताना बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे वय कमी असल्याचे आढळून आल्यावर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या धक्कादायक घटनेचा भांडाफोड झाला. पोलिसांनी घटनेची तातडीने दखल घेत पीडितेचा जबाब नोंदवला. दरम्यान, घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनीही पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी हॉस्पिटलच्या आवारात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ट्विट
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलच्या पार्किंग एरियात काम करणाऱ्या तांत्रिक आणि अन्य दोघांना अटक केली. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या बाळाचा डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच, डीएनए अहवाल प्राप्त होण्यास एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर बाळाचा खरा वडील कोण आहे याबाबत माहिती मिळू शकेल.