Rajasthan Election 2023: भाजपने राजस्थानमध्ये 41 उमेदवारांची यादी जाहीर केली, खासदारांनाही दिली तिकिटे, पाहा संपूर्ण यादी
राजस्थानमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, जी निवडणूक संपल्यानंतर काढली जाईल. राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे,
भाजपने राजस्थान निवडणूकसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या 41 उमेदवारांच्या यादीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 7 खासदार उभे केले आहेत. राज्यवर्धन राठौर, दिया कुमार, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, बाबा बालकनाथ, देवी सिंह पटेल हे 7 खासदार आहेत ज्यांना भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.
झोटवाडा येथून राज्यवर्धन राठोड यांना तिकीट मिळाले आहे. तिजारा येथून खासदार असलेले बाबा बालक नाथ हेही राज्याच्या निवडणुकीत उतरले आहेत. याशिवाय पक्षाने सवाई माधोपूरमधून किरोरी लाल मीना, किशनगडचे खासदार भगीरथ चौधरी आणि सांचोरचे खासदार श्री देवजी पटेल यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले आहे. (हेही वाचा - MLAs Disqualification Case In Maharashtra: सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर एकत्र होणार सुनावणी)
पाहा पोस्ट -
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राजस्थानमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, जी निवडणूक संपल्यानंतर काढली जाईल. राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
राजस्थानमध्ये अधिसूचना आणि नामांकन 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 7 नोव्हेंबरपर्यंत होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर आहे. याशिवाय 23 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.