Dausa Borewell Rescue: पाच वर्षांचा मुलगा बोरवेलमध्ये अडकला; बचावकार्य सुरु; राजस्थान येथील घटना
5-Year-Old Trapped in Borewell: राजस्थान राज्यातल दौसा येथे 150 फूट खोल बोअरवेलमध्ये 5 वर्षांचा आर्यन नामक मुलगा अडकल्यामुळे बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. आर्यनच्या स्थितीबद्दलची अद्ययावत माहिती, घ्या जाणून.
राजस्थान राज्यातील दौसा (Dausa News) जिल्ह्यात असलेल्या कालिखड गावात 150 फूट खोल खुल्या बोअरवेलमध्ये (Rajasthan Borewell Rescue) पडलेल्या पाच वर्षांच्या आर्यनला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य (Aryan Rescue Mission) सुरू आहे. मदत आणि बचाव कार्याचा आज तिसरा दिवस आहे. सोमवारी (9 डिसेंबर) संध्याकाळपासून बोरवेलमध्ये अडकलेल्या (Open Borewell Accidents) आर्यनपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि नागरी संरक्षण पथकांसह अधिकारी अथक परिश्रम घेत आहेत. बचाव पथकांनी समांतर बोगदा खोदण्यासाठी अर्थमूव्हर्स, ट्रॅक्टर आणि एक्ससीएमजी 180 पाईलिंग रिग मशीन तैनात केले. मुलाला पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवला जात आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
बोरवेलच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याचे मंत्र्यांचे आवाहन
राजस्थानचे भाजप नेते आणि राज्य मंत्री किरोडी लाल मीना यांनी घटनास्थळास भेट दिली, जिथे कॅमेऱ्यामधून आर्यनच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. मीना यांनी बोअरवेलच्या सुरक्षेसंबंधी कठोर कायद्यांचा अभाव अधोरेखित करत म्हटले, "या घटना देशभरात घडतात. निर्देश असले तरी बोअरवेल आच्छादित आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी आणि मुलांची सुरक्षा कायम ठेवण्यासाठी योग्य कायदा केला पाहिजे ". (हेही वाचा, Madhya Pradesh: बोअरवेलमध्ये पडून ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना)
अशीच घटना सप्टेंबरमध्ये घडली
दौसामध्ये अशा प्रकारची ही पहिली घटना नाही. सप्टेंबरमध्ये, बांदीकुई परिसरात 35 फूट बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या मुलीची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. 18 तास चाललेल्या या मोहिमेत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अशाच समन्वित प्रयत्नांचा समावेश होता. (हेही वाचा, Gujarat: दीड वर्षाची मुलगी बोअरवेलमध्ये पडली, 15 तासाचं ऑपरेशन अयशस्वी)
बचावकार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
बचावकार्य आणि सध्यास्थिती
आर्यनला वाचवण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे. समांतर बोगदा पूर्ण करण्यासाठी आणि मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पथके रात्रभर काम करत आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी बोअरवेल झाकून ठेवण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी स्थानिक आणि शेत मालकांना केले आहे.
दरम्यान, अशा प्रकारे बोरवेलमध्ये लहान मुलगा पडल्याची ही पहिलीच घटना नाही. या पूर्वीही अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या घटना घडण्याचे प्रमाण कमी असले तरी, ते दुर्लक्षीत करण्यासारखे नाही. अनेकदा शेतकरी, गावकरी किंवा एखादी व्यक्ती आपल्या परिसरात पाण्याच्या शोधात बोरवेल घेत असते. वास्तविक पाहता काम पूर्ण झाल्यानंतर बोरवेलचे तोंड बंद करणे आवश्यक असते. पण, बहुतेक वेळा ते उघडेच राहते. त्यामुळे अनेकदा त्यात लहानमुले पडण्याच्या घटना घडतात. अनेकदा या घटना चिमुकल्यांच्या जीवावर बेततात. त्यामुळे अशा घटना घडूच नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होते आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)