Rajasthan Accident: राजस्थानमध्ये बस आणि कारची धडक, 6 ठार, 2 जखमी

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

Accident (PC - File Photo)

राजस्थान राज्यात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात पहाटे बसला कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सीकरमधील खातू श्यामजी मंदिरातून पीडित धौलपूर जिल्ह्यातील त्यांच्या घरी परतत असताना पहाटे 1:00 च्या सुमारास हा अपघात झाला, असे एसएचओ बने सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की, दोन बैलही जागीच मृतावस्थेत आढळले असून, प्रथमदर्शनी, बैल रस्त्यावर भांडत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (हेही वाचा - Karnataka Accident: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, 10 जण जखमी)

यावेळी बसची धडक एवढी जास्त होती की, कारचा चक्काचूर झालेल्या पहायला मिळालाय या अपघातात हरेंद्र सिंग (32), त्यांची पत्नी ममता (30), त्यांची मुलगी जान्हवी (6), ममताची बहीण सुधा (35), तिचा पती संतोष (37) आणि मुलगा अनुज (5) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात एका पोलिस स्टेशनजवळ झाला आणि टक्कर झाल्यानंतर काही वेळातच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळ गाठले आणि पीडितांना रुग्णालयात दाखल केले जेथे पोहोचल्यावर त्यापैकी सहा जणांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेत दोन अल्पवयीन जखमी झाले तर एक चिमुकली सुखरूप बचावली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास हा करत असून हा अपघात कसा झाला या बाबत शोध घेत आहे. दरम्यान या घटनेमुळे संपुर्ण कुटुंबावर शोककला पसरली आहे.



संबंधित बातम्या