ट्रेनमध्ये चोरी झाल्यास दाखल करता येणार तक्रार, प्रवाशांसाठी GRP सहयात्री अॅप लॉन्च
मात्र चालत्या ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेस बहुतांश प्रमाणात चोरी होण्याची शक्यता फार असते. परंतु आता ट्रेनमध्ये चोरी झाल्यास त्याबाबत प्रवाशांना तक्रार दाखल करता येणार आहे.
देशात दररोज ट्रेनने लाखोच्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात. मात्र चालत्या ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेस बहुतांश प्रमाणात चोरी होण्याची शक्यता फार असते. परंतु आता ट्रेनमध्ये चोरी झाल्यास त्याबाबत प्रवाशांना तक्रार दाखल करता येणार आहे. यासाठी जीआरपी (GRP) सहयात्री नावाचे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी गुरुवारी जीआरपी सहयात्री अॅप लॉन्च केले आहे. याच्या माध्यमातून दिल्ली संबंधित तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
तसेच देशभरातील जीआरपी पोलिसांसाठी एक वेबसाइट (railways.delhipolice.gov.in) लॉन्च केली आहे. त्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या राज्यातील लपून बसलेले गुन्हेगार आणि आरोपींचा डेटा शेअर करता येणार आहे. एवढेच नाही तर तक्रार दाखल करण्यासाठी राजकीय रेल्वे पोलीस दलाने (GRP) च्या मदतीसाठी एक वेबसाईट आणि मोबाईल अॅप सुरु केला आहे. त्यानुसार प्रवाशांना त्यांच्या कोणत्याही गोष्टीची चोरी झाल्यास ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता येणार आहे.(चोरीला गेलेला मोबाईल परत कसा मिळवाल ?)
तसेच मुंबईतील डॉकयार्ड रेल्वेस्थानकात तिकिट खिडकी उखडून काही चोरांनी तिकिट विक्री करून जमा झालेल्या रक्कमेवर डल्ला मारल्याची घटना समोर आली होती. याचबरोबर पैसे मिळण्याच्या आशेने स्थानकातील वॉटर वेंडिंग मशिनचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी भामट्यांनी 3 हजार 886 रुपयांची रक्कमेवर डल्ला मारला होता.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-कश्मीर मधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वैष्णो देवीला जाण्यासाठी वंदे भारत ही सुपर फास्ट एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता भाविकांना फक्त 8 तासात वैष्णो देवी येथे पोहचण्यासाठी प्रवास करावा लागणार आहे. तर दिल्ली येथून सकाळी 6 वाजता ही एक्सप्रेस सुटणार असून दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास कटरा रेल्वेस्थानकात पोहचणार आहे.