Passenger Unzipping Pants In Goa Train: ट्रेनमध्ये महिला प्रवाशांसमोर असभ्य वर्तन, एकास अटक; झोपताना पॅंट उतरवल्याचा दावा
दरम्यान, आरोपीने तिच्यासमोर अश्लिल कृत्य केले. दावा केला जात आहे की, सदर महिला झोपील असताना आरपीने पॅन्ट उतरवली. ज्यामुळे पीडितेच्या मनात लज्जास्पद भावना निर्माण झाली.
रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली रेल्वे पोलिसांनी एका 47 वर्षीय इसमास ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार सदर इसम हा मूळचा महाराष्ट्रातील राहणारा असून दत्तात्रय चव्हाण असे त्याचे नाव आहे. ही घटना गोव्यासाठी रवाना झाेलेल्या पूर्णा एक्स्प्रेसमध्ये ( Poorna Express Goa Train) कर्नाटकातील (Karnataka) गोकर्ण रेल्वे स्टेशन (Gokarna Railway Station) जवळ घडली. याच ट्रेनने 22 वर्षीय महिला केरळहून गोव्याला मित्रांसह प्रवास करत होती. दरम्यान, आरोपीने तिच्यासमोर अश्लिल कृत्य केले. दावा केला जात आहे की, सदर महिला झोपील असताना आरपीने पॅन्ट उतरवली. ज्यामुळे पीडितेच्या मनात लज्जास्पद भावना निर्माण झाली.
कोकण रेल्वे पोलिसांकडून आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या दोन मित्रांनी आरोपीला सदर कृत्य करताना पाहिले. त्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वेच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागवली. तक्रार प्राप्त होताच कोकण रेल्वे पोलीस (Konkan Railway Police) सेवेतील, पोलीस निरीक्षक सुनील गुडलार आणि ASI गोम्स, एचसी मिंगुएल वाझ, पीसी-कुलदीप गावकर आणि एलपीसी नीता कवळेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने, मडगाव रेल्वे स्थानकावर ट्रेन आल्यावर आरोपीला पकडले. (हेही वाचा, Titwala Rape Case: टिटवाळा रेल्वे स्थानकात महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत)
महिला झोपली असताना आरोपीने पँट उतरवली
अधिक माहिती अशी की, ट्रेन गोव्यातील मडगाव स्थानकावर पोहोचली तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेच्या साक्षीदारांनी सांगितले की, आरोपीने त्याची पॅंट उतरवली आणि तरुणी झोपलेली असताना असभ्य वर्तन करत असल्याचे पाहिले. या निंदनीय कृत्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर पीडितेच्या मित्रांनी तातडीने रेल्वेच्या आपत्कालीन मदत क्रमांकावर संपर्क साधला. (हेही वाचा, Rape: रेल्वे स्थानकावरील 17 वर्षीय दिव्यांग तरुणीवर बलात्कार, दोघांना अटक)
आपत्कालीन सेवेसाठी 182 वर संपर्क साधा
रेल्वे प्रवाशांच्या माहितीसाठी असे की, 182 हा भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक आहे. रेल्वेच्या आवारात चोरी, छळ, पिक पॉकेटिंग किंवा इतर गुन्हेगारी घटनांमध्ये तातडीने मदत मिळविण्यासाठी या क्रमांकाचा वापर करतो. या क्रमांकावर संपर्क केल्यास भारतीय रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होतात. तसेच, पीडितांना मदत उपलब्ध करुन देतात. महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांना चोवीस तास सुरक्षेशी संबंधित सहाय्य प्रदान करण्यासाठी, भारतीय रेल्वेवरील रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षांद्वारे 182 क्रमांकाची तीन अंकी सुरक्षा हेल्पलाइन कार्यान्वित झाली आहे. ही हेल्पलाईन आरपीएफ कर्मचार्यांकडून चालविली जाते आणि महिला प्रवाशांसह प्रवाशांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवेश करता येतो. याशिवाय, आणखी एका अखिल भारतीय हेल्पलाइन 138 वर स्वच्छता, अन्न आणि खानपान, कोच देखभाल, वैद्यकीय आणीबाणी आणि तातडीच्या सहाय्यासाठी कॉल प्राप्त होतो. यामध्ये महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांना मदत मिळवता येणार आहे. याबाबतची माहिती तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री श्री राजेन गोहेन यांनी लोकसभेत 30 नोव्हेंबर 2016 रोजी (बुधवार) रोजी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.