रेल्वे मध्ये मसाज संस्कृतीच्या विरुद्ध, इंदौर च्या खासदारांचं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र
ही सुविधा भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचे म्हणत इंदौरचे खासदार शंकर लालवानी यांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे.
भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांसाठी सुरु केलेल्या मसाज सुविधेला सुरु होण्याआधीच ग्रहण लागल्याची चिन्हे दिसत आहेत. इंदौरचे (Inodore)खासदार शंकर लालवानी (Shankar Lalwani) यांनी अलीकडेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. लालवानी यांच्या मते, रेल्वे मध्ये महिला प्रवासी देखील असतात त्यांच्या उपस्थितीत अशा प्रकारची सेवा देणे उचित ठरणार नाही, शिवाय अशा अनावश्यक सेवेपेक्षा वैद्यकीय सुविधा पुरवण्यावर भर दिल्यास अधिक उचित ठरेल. वेस्टर्न रेल्वे झोन रतलाम डिव्हिजनकडून ठेवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार इंदौर येथून रवाना होणाऱ्या 39 ट्रेनमध्ये मसाज सेवा उपलब्ध असणार होती . मात्र लालवानी यांनी लिहिलेल्या पत्रात ही सुविधा भारतीय सभ्येतला धरून नाही तसेच आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे असे म्हंटले आहे.
शंकर लालवानी यांनी 10 जून ला याबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना तक्रार करून पत्र लिहिले. रेल्वेच्या या सुविधेला विरोध करणाऱ्या महिला संघटनांच्या तक्रारी लक्षात घेऊन आपण हे पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले होते. ज्यानुसार पर्यटक विशेष रेल्वे मध्ये वा शताब्दी, राजधानी एक्प्रेसमध्ये पुरवणे समजू शकते, मात्र सध्याच्या योजनेनुसार पॅसेंजर ट्रेनमध्ये ही योजना आहे. पॅसेंजर गाड्यांमध्ये सामान्य जनता प्रवास करते तसेच हा प्रवास देखील तीन ते चार तासांपेक्षा जास्त नसतो.असे असताना मसाजची गरज काय असा प्रश्न लालवानी यांनी केला होता. आता UTS अॅपवर मुंबई, पुणे, नागपूर विभागातील लांब पल्ल्याचीही तिकीट होणार बुक !
रेल्वेच्या मसाज सुविधेमुळे 20 लाख रुपये तसेच मसाज सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींच्या तिकिटांचे 90 लाख रुपये इतका अतिरिक्त महसूल जमा होणार होता. ही सुविधा गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम अशा तीन गटांत ही सुविधा पुरवण्यात येणार होती. गोल्ड वर्गवारी अंतर्गत नॉन स्टिकी ऑलिव्ह ऑईलने मसाज केला जाणार असून त्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल. डायमंड सेवेमार्फत 200 रुपयांत सुगंधी तेलाने, तर प्लॅटिनममध्ये 300 रुपयांत मलमाने मसाज केला जाणार आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र आता सध्या होत असणार अविरोध पाहता हा प्लॅन लागू होतो कि काही दिवसांच्या चर्चेनेच कोलमडून पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.