Rahul Gandhi On Inflation, Unemployment: आम्ही देश बेरोजगारी, महागाईच्या खाईत लोटला नाही, राहुल गांधी यांचे भाजपवर टीकास्त्र

मी एवढेच सांगू इच्छित की, आम्ही देश महागाई (Inflation) आणि बेरोजगारी (Unemployment ) यांच्या खाईत ढकलला नाही. आजवर कधीच नव्हती इतकी महागाई आणि बेरोजगारी भाजपने देशाला दिली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi shares photo with Sonia Gandhi (PC - Twitter/Rahul Gandhi)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशातील महागाई आणि बेरोजगारी या विषयावर ते गुरुवारी बोलत होते. राहुल गांधई म्हणाले की, भाजप नेहमीच आम्हाला विचारतो काँग्रेसने 70 वर्षांमध्ये काय केले. मी एवढेच सांगू इच्छित की, आम्ही देश महागाई (Inflation) आणि बेरोजगारी (Unemployment ) यांच्या खाईत ढकलला नाही. आजवर कधीच नव्हती इतकी महागाई आणि बेरोजगारी भाजपने देशाला दिली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी भाजपवरील हल्ला कायम ठेवत म्हटले की, आज भारत 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारीशी झुंजत आहे आणि 100 पैकी 42 तरुणांकडे उत्पन्न किंवा उपजीविकेचे साधन नाही. देशातील नागरिक महागाईच्या या अवस्थेतून आजवर कधीच गेले नाहीत. रेशनपासून ते इंधनापर्यंत सर्व काही प्रचंड महाग आहे. लोकांची आर्थिक क्षमता क्षीण होते आहे.त्यांना खाण्यासाठी किंवा आवश्यक ठिकाणी प्रवास करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. एकाबाजूला अशी टोकाची परिस्थिती असताना, सरकाला देशातील जनतेची नव्हे तर आपल्या 'भांडवलवादी मित्रांची' काळजी असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi with Sonia Gandhi: राहुल गांधी यांचा आई सोनिया यांच्यासोबतचा आनंदी क्षण पाहिलात का? (Watch Video))

राहुल गांधी पुढे म्हणाले, भाजप सरकार आपले काम पूर्ण करू शकत नाही, किंवा त्याला जनतेची पर्वा नाही. सत्य हे आहे की, हे सरकार त्यांच्या 'भांडवलवादी मित्रां'साठी काहीही करू शकते, पण ते जसतेसाठी काहीच करु करत नाही. देशाची आणि या देशातील लोकांची काळजी घ्या. ते पुढे म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून देशाला एकत्र आणण्याचे पक्षाचे ध्येय आहे. आपल्याला देशाला एकत्र आणायचे आहे आणि सरकारला प्रश्न विचारायचे आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' मंगळवारी दुपारी दिल्लीतील मार्गघाट हनुमान मंदिरातून उत्तर प्रदेशात दाखल झाली. गुरुवारी ही यात्रा उत्तर प्रदेशातील शामलीच्या आयलुम गावातून पुन्हा सुरू झाली. 6 जानेवारी रोजी हरियाणात पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी तीन दिवसांत ही यात्रा उत्तर प्रदेश ओलांडणे अपेक्षित आहे. ही यात्रा दिल्लीहून लोणी मार्गे उत्तर प्रदेशात दाखल झाली.