Rahul Gandhi Visits Wayanad: राहुल गांधी तातडीने वायनाडमध्ये दाखल, 'भारत जोडो न्याय यात्रा' अल्प काळासाठी स्थगित, कारण घ्या जाणून
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड येथे जाऊन वन विभागाचे निरीक्षक व्हीपी पॉल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पॉल यांचा हत्तींनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. राहुल गांधी यांनी वायनाडच्या भेटीदरम्यान (Rahul Gandhi Visits Wayanad) व्हीपी पॉल यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड येथे जाऊन वन विभागाचे निरीक्षक व्हीपी पॉल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पॉल यांचा हत्तींनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. राहुल गांधी यांनी वायनाडच्या भेटीदरम्यान (Rahul Gandhi Visits Wayanad) व्हीपी पॉल यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. तसेच आपण त्यांच्या दु:खामध्ये सहभाही असल्याचे म्हटले. जंगली हत्तीने पॉल यांना पायदळी तुडवले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घडलेल्या घटनेबद्दल नागरिक संतपाक व्यक्त करत होते. राहुल गांधी यांनी पीडितांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक यांचे सात्वन केले. हत्तींच्या हल्ल्याबातब माहिती मिळताच गांधींनी वाराणसीतील त्यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) स्थगित केली आणि ते वायनाडला रवाना झाले.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना राहुल गांधी यांचे पत्र
राहुल गांधी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहून या घटनेवर निर्णायक कारवाईची विनंती केली आहे. केरळचे वनमंत्री एके ससेंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तीने मनंथवाडीजवळील निवासी भागात प्रवेश केला तेव्हा पीडितेवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर केरळ सरकारने 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आणि मृतांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, मुख्यमंत्री, पिनाराई विजयन यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना वायनाडमधील वन्यजीव हल्ल्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा, Elephant Attack Viral Video: अभयारण्यात रस्त्याच्या कडेला फोटो काढणाऱ्या पर्यटकांवर हत्तीचा हल्ला; धावत केला पाठलाग, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch))
केरळ सरकारची महत्त्वाची बैठक
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारीला वायनाड येथे एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महसूल, वन आणि स्थानिक स्वराज्य विभागाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत वायनाड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, उच्चस्तरीय अधिकारी सहभागी होणार आहेत. यासोबतच, आज सकाळी केनिचिराजवळ वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे एक गाय मृतावस्थेत आढळल्याची आणखी एक घटना नोंदवली गेली. संतप्त झालेल्या स्थानिकांनी गाईचा मृतदेह आणून वनविभागाच्या जीपच्या बोनेटवर ठेवला आणि तातडीने कारवाईची मागणी लावून धरली. (हेही वाचा, Robert Vadra On Rahul Gandhi: राहुल गांधी चांगले नेते, देशाचे भले करतील- रॉबर्ट वाड्रा)
हत्तींच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्य घबराट
वायनाडमध्ये सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. वन्य प्राणी आणि हत्तींच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्य घबराट आहे. वन विभागाने या हत्तींवर आणि त्यांच्या हल्ल्यांवर वेळीच उपाययोजना करुन तोडगा काढावा अशी स्थानिकांची मागणी आहे. हत्तींचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना आमि रणनिती आखण्यासाठीच एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. अपेक्षीत आहे की, त्यावर तोडगा निघेल. या आधीही हत्तींनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)