Rahul Gandhi On Savarkar: गांधी कधीच माफी मागत नाही, माझे नावही सावरकर नाही; राहुल गांधी यांचा हल्लाबोल (Watch Video)

माझे नाव सावरकर (Rahul Gandhi On Savarkar नाही आणि गांधी कधीच माफी मागत नाही. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे देशात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. तसेच, स्वातंत्र्यावीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या माफीचा मुद्दाही पुन्हा एकदा पुढे आला आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईबद्दल बोलताना पत्रकार परिषदेत सांगितले की, माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरी आपण सत्य मांडत राहू. खरे तेच बोलत राहू. प्रश्न विचारत राहू. दरम्यान, राहुल यांना माफी मागण्याबद्दल विचारले असता, राहुल गांधी यांनी पुनरुच्चार करत सांगितले की, मी गांधी आहे. माझे नाव सावरकर (Rahul Gandhi On Savarkar नाही आणि गांधी कधीच माफी मागत नाही. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे देशात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. तसेच, स्वातंत्र्यावीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या माफीचा मुद्दाही पुन्हा एकदा पुढे आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत अदानी मुद्द्यावरुन विचारलेल्या प्रश्नामुळेच आपल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आली असली तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही. माझी बांधिलकी भारतीय लोकशाही आणि जनतेशी आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी आपण सातत्याने आवाज उठवत राहू. त्यासाठी कोणतीही शिक्षा भोगायला आपण तयार आहोत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीवरुन दाखल झालेल्या अवमान प्रकरणात सूरतमधील कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या काहीच तासात लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवले. या सर्व घडामोडी नंतर राहुल गांधी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (हेही वाचा, Rahul Gandhi On Gautam Adani & PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, कोणतीही कारवाई केली तरी लढत राहीन- राहुल गांधी)

व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरले आहेत. उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते आहे? हा प्रश्न संसदेत विचारल्याने त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. दुसरे म्हणजे मी संसदेत बोलल्यानंतर माझे भाषणही संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर मला दुसऱ्यांदा सभागृहात बोलण्याची संधीही दिली नाही. संसदेत बोलू दिले जावे यासाठी आपण लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीले. लोकसभा अध्यक्षांची प्रत्यक्ष भेटही घेतली. परंतू, तरीही मला संसदेत बोलू दिले नाही. त्यामुळे यावरुन स्पष्ट होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी किती घाबरले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif