'राहुल गांधी यांनी 100 जन्म घेतले तरी सावरकर होऊ शकणार नाहीत'; भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा पलटवार

राहुल गांधी यांनी 100 जन्म जरी घेतले तरी ते वीर सावरकर होणार नाहीत आणि राहुल यांना नवीन ओळख हवी असल्यास आजपासून भाजप त्यांना राहुल थोडा शरम कर म्ह्णून संबोधू शकतात कारण त्यांनी अलीकडेच केलेल्या रेप इन इंडिया (Rape In India) आणि मेक इन इंडिया (Make In India) च्या तुलनेने लाज आणि नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असे संबित पात्रा यांनी म्हंटले आहे.

Rahul Gandhi And Sambit Patra (Photo Credits: PTI, ANI)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सध्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi)  आणि बहीण प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या समवेत आज दिल्लीत रामलीला मैदानावर (Ramlila Maidan)  भारत बचाव रॅलीत (Bharat Bachao Rally) भाषण केले. या भाषणात भाजप सरकारला (BJP) धारेवर धरत त्यांनी जणू काही टीकांचा वर्षावच केला होता. मात्र या साऱ्यात त्यांचे "मी माफी मागण्यासाठी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी   आहे" हे वाक्य सर्वांच्याच भुवया उंचावून गेले. राहुल यांच्या वाक्यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra)  यांनी पलटवार करताना राहुल गांधी यांनी 100 जन्म जरी घेतले तरी ते वीर सावरकर होणार नाहीत असे उत्तर दिले आहे, मुळात राहुल यांना नवीन ओळख हवी असल्यास आजपासून भाजप त्यांना 'राहुल थोडा शरम कर' म्ह्णून संबोधू शकतात कारण त्यांनी अलीकडेच केलेल्या रेप इन इंडिया (Rape In India) आणि मेक इन इंडिया (Make In India) च्या तुलनेने लाज आणि नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असेही संबित पात्रा यांनी म्हंटले आहे.

संबित पात्रा यांनी प्रतिक्रीया देताना, राहुल गांधी हे कलम 370, एयर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक किंवा अगदी अलीकडच्या नागरिकत्व सुधारणा (दुरुस्ती) कायद्यावर जे मत मांडतात ते भारतीय कमी असून पाकिस्तानी भाषा अधिक बोलत असल्याचे भासते त्यामुळे त्यांची वीर सावरकर यांच्याशी तुलना देखील केली जाऊ शकत नाही, असे म्हंटले आहे. ('बलात्कार, नक्षलवाद, दहशतवाद, ही नेहरू घराण्याची देण' साध्वी प्राची यांचे धक्कादायक विधान)

ANI ट्विट

तर दुसरीकडे नरसिंह राव, गिरीराज सिंह यांनी सुद्धा राहुल यांच्या या विधानाचे उत्तर देत, राहुल गांधी यांचे आताचे आडनाव देखील उधारीचे आहे त्याऐवजी त्यांना जिन्ना हे आडनाव शोभेल असे खरमरीत उत्तर दिले आहे.

नरसिंह राव ट्विट

गिरीराज सिंह ट्विट

वास्तविक एका सभेत बोलत असताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया प्रकल्पाचे विडंबन करत आता सध्या देशात नुसते रेप इन इंडिया सुरु आहे असे वादग्रस्त विधान केले होते, ज्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासहित अनेकांनी त्यांना लोकसभा अधिवेशनात खडेबोल सुनावले होते. तसेच राहुल यांनी माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली होती यावर आज उत्तर देताना राहुल यांनी आपण सावरकर नसल्याने माफी मागणार नाही अशी आणखीन एक वादग्रस्त टिपण्णी केली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now