Rahul Gandhi on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास गाडीचा रिव्हर्स गिअर, ब्रेकही फेल- राहुल गांधी

इतकेच नव्हे तर त्या गाडीचे ब्रेकही फेल झाले आहेत. घरगुती गॅसचे दर वाढल्याने देशातील आम नागरिक पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करणयासाठी मजबूर झाला आहे,.

Rahul Gandhi on Narendra Mod | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी घरगुती गॅस (LPG Price Hike) दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधत म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या गाडीने रिव्हर्स गिअर टाकला आहे. इतकेच नव्हे तर त्या गाडीचे ब्रेकही फेल झाले आहेत. घरगुती गॅसचे दर वाढल्याने देशातील आम नागरिक पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करणयासाठी मजबूर झाला आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विकासाच्या अश्वासनांपासून कोसो दूर, लाखो कटुंबे चुल फुंकण्यासाठी मजबूर, मोदीजींच्या विकासाच्या गाडीने रिवर्स गिअर टाकला आहे आणि ब्रेकही फेल झाला आहे. राहुल गांधी यांनी ज्या ज्या वृत्ताचा हवाला दिला आहे त्यात एक सर्वेक्शन रिपोर्टच्या आधारे म्हटले आहे की, घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने 42% नागरिकांच्या कुटुंबीयांनी जेवण रांधण्यासाठी पुन्हा एकदा लाकडाचा उपयोग सुरु केला आहे. (हेही वाचा, Petrol, Diesel Price: काय सांगता? पुन्हा वाढणार पेट्रोल, डिझेल दर? Excise Duty ठरणार केवळ वरवरचा मुलामा?)

दरम्यान, महागाईच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी नेहमीच आक्रमक राहिले आहेत. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आले आहेत. सोबतच काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनीही इंधन दराच्या किमती आणखी कमी करण्यासाठी एक्साईज ड्युटी कमी करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन आम जनतेला दिलासा मिळेल.