Rahul Gandhi on PM Narendra Modi: 'सदियों का बनाया,पलों में मिटाया' राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकारवर टीका
कांग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार (Narendra Modi Government) देशाला अत्यंत कठीण काळात आणून ठेवले आहे.
कांग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार (Narendra Modi Government) देशाला अत्यंत कठीण काळात आणून ठेवले आहे. केंद्रातील भाजप सरकार विरोधात राहुल गांधी यांनी टीकेची धार अधीक तीव्र केली आहे. त्यांनी कोरोना व्हायरस लसीची कमतरता (Corona Vaccine Shortage), लाईन ऑफ कंट्रोल (LAC), बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या यावरुन ट्विटरवरुन शाब्दीक हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशात अनेक दशकांपासून निर्माण झालले, अल्पावधीत गमावले आहे. देशातील जनतेला माहिती आहे इतका कठीण काळ कोणी आणला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरमध्ये कोणाचाच उल्लेख केला नाही. परंतू, ट्विटरमधील शब्द आणि वाक्यरचना पहता त्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर असल्याचे स्पष्ट जाणवते.
देशात कोरोना व्हायरस लसीकरण अभियान सुरु आहे. कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणासाठी सरकाला कथीत स्वरुपात आलेले अपयश, आवश्यक औषधांचा काळाबाजार, इंधन दरांच्या वाढत्या किमती यांसारखे मुद्दे असतील किंवा भारत चीन सीमा वादाचा विषय. राहुल गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरत टीका केली आहे. याच आठवड्यात राहुल गांधी यांनी खाद्य तेलात दरात झालेल्या वाढीवरुन ट्विट केले होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'खाल्लेही, मित्रांना खाऊ घातलेही. फक्त जनतेला खाऊ देत नाहीत.' या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी PriceHike हा हॅशटॅगही वापरला होता.
राहुल गांधी
केंद्रीय मंत्रिमंडळात नुकताच फेरबदल करण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांना हटवून त्या ठिकाणी मनसुख मंडाविया यांची निवड केल्यावरुनही राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले होते. राहुल गांधी यांनी खोचक ट्विट करत म्हटले होते की, 'याचा अर्थ देशात आता कोरोणा लसीच्या मात्रेची कमतरता भासणार नाही.'
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)