Rafale in Lok Sabha: ' 2019 मध्ये भारताला मिळणार राफेल विमान', संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांचा काँग्रेसवर पलटवर

तर, उर्वरीत विमाने 2022 मध्ये मिळणार होते. या व्यवहारानुसार पहिले राफेल विमान 2019 च्या सप्टेंबर महिन्यात येईल. याचाच अर्थ हे विमान करार झाल्यानुसार 3 वर्षांच्या आत येईल, असे सांगत सितारमण यांनी विरोधकांवर पलटवार केला.

Nirmala Sitharaman | (Photo courtesy: Lok Sabha TV)

Rafale in Lok Sabha: संसदेच्या लोकसभा सभागृहात आज (शुक्रवार, 4 जानेवारी) राफेल विमान खरेदी प्रकरणावर चर्चा सुरु आहे.  संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी विरोधकांच्या आरोपांना सभागृहात जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. यूपीए (UPA) सरकारने जेव्हा राफेल विमान खरेदीबाबत व्यवहार (Rafale Deal) केला तेव्हा, 18 विमाने पूर्ण रुपात मिळणार होती. उर्वरीत 108 विमाने 11 वर्षांच्या कालावधीत तयार केली जाणार होती. मात्र, 2006 नंतर 2014 पर्यंत केवळ 18 विमानेही मिळवू शकले नहीत. आमच्या कार्यकाळात एनडीए (NDA) 2016मध्ये झालेल्या व्यवहारानुसार पहिले विमान 3 वर्षांत येणार होते. तर, उर्वरीत विमाने 2022 मध्ये मिळणार होते. या व्यवहारानुसार पहिले राफेल विमान 2019 च्या सप्टेंबर महिन्यात येईल. याचाच अर्थ हे विमान करार झाल्यानुसार 3 वर्षांच्या आत येईल, असे सांगत सीतारमण यांनी विरोधकांवर पलटवार केला.

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना सभागृहात सीतारमण यांनी सांगितले, आज मी विरोधकांच्या प्रत्येक आरोपांचे उत्तर देणार आहे. संरक्षण सामग्री करार हा देशाच्या सुरक्षेशी संबंधीत मुद्दा आहे. देशाला हे समजलेच पाहिजे की, संरक्षण करार हे गोपनीय असतात. देशाच्या सीमेवर संवेदनशील व्यवहार आहे. पण, सरकारमध्ये जे पण आहे ते देशाला समजले पाहिजे. गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या शेजाऱ्यांमध्ये काय बदल झाला आहे? जीनजवळ 400 लढावू विमाने आहेत. यात 'फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट'चाही समावेश आहे. पाकिस्ताननेही आपल्या लडावू विमानांची क्षमता वाढवली आहे. आमच्याजवळ काय आहे? 2002मध्ये आमच्या जवळ 42 स्व्कॉड्रन होती. 2007मध्ये यात घट होऊन 2015 मध्ये 32 स्व्कॉड्रन झाली. आमचा शेजारी संरक्षण सामग्रीची ताकत वाढवत आहे आणि आम्ही कमी करत आहोत. (हेही वाचा, राफेल डील: मोदी सरकारला अडचणीत आणणारे राहुल गांधी यांचे ५ प्रश्न)

सभागृहात आपल्या भाषणाच्या अखेरीस सीतारमण म्हणाल्या, संरक्षणमंत्री खोट्या आहेत असा सभागृहात आरोप करण्यात आला. मला काहीच आत्मसन्मान नाही का? मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. मला श्रीमंत कुटुंबाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. पंतप्रधान मोदीही गरीब कुटुंबातून येतात. परंतू, त्यांनाही चोर म्हणून संबोधन्यात आले. आज आम्हाला बोलताना शांत बसा म्हणून सांगण्यात येत आहे. पण, माझ्यावर, पंतप्रधानांवर आरोप करताना कधी काँग्रेसने आपल्या खासदारांना शांत केले? आम्हाला कोणताच आत्मसन्मान नाही, असा सवालही सीतारमण यांनी अध्यक्षांच्या माध्यमातून सभागृहाला विचारला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif