Lalit Khaitan Becomes India's Newest Billionaire: ललित खेतान, वयाच्या 80 व्या वर्षी बनले भारतातील सर्वात नवीन अब्जाधीश

तुम्हाला ललित खेतान यांच्याबद्दल माहिती आहे काय? जे वयाच्या 80 व्या वर्षी भारतातील नवे अब्जाधीश बनले आहेत. जाणून घ्या Radico Khaitan त्यांच्या कंपनीविषयी

Lalit Khaitan | (Photo courtesy: archived, edited, symbolic)

Who is Lalit Khaitan: ललित खेतान (Lalit Khaitan) हे वय 80 व्या वर्षी भारताचे नवे अब्जाधीश (Billionaire in India) बनले आहेत. भारतामध्ये झपाट्याने विस्तारत असलेल्या अल्कोहोल उद्योग (Alcohol Industry) क्षेत्रात त्यांनी यशाचे शिखर पादाक्रांत करत ही कामगिरी केली आहे. रॅडिको खेतान (Radico Khaitan) कंपनीचे अध्यक्ष म्हणून त्यांना अब्जाधीशाचा दर्जा प्राप्त झाला आहे. रॅडिको खेतान हे 8 पीएम व्हिस्की (8 PM whisky), ओल्ड अ‍ॅडमिरल ब्रँडी (Old Admiral Brandy), मॅजिक मोमेंट्स वोडका (Magic Moments Vodka) आणि रामपूर सिंगल माल्ट (Rampur Single Malt) यासारख्या अल्कोहोलिक पेयांच्या विविध पोर्टफोलिओसाठी प्रसिद्ध आहे, जे सर्व हिमालयाच्या पायथ्याशी उत्पादित केले जातात.

 सन 1943 मध्ये बॉटलर म्हणून कंपनीची सुरुवात

रेडिको खेतान कंपनीला काही दशकांचा इतिहास आहे. सन 1943 मध्ये बॉटलर म्हणून कंपनीने आपल्या उत्पादनाची सुरुवात केली. पुढे ही कंपनी अल्कोहोल तयार करण्याच्या उद्योगात उतरली. तेव्हापासून कंपनीने आपल्या वाटचालीचा वेग वाढवतच नेला. सन 1997 मध्ये खैतान यांचा मुलगा अभिषेक कपनीशी जोडला गेला. अभिषेक हा मार्केटींग व्यवसायातील जाणकार आहे. अभिषेकच्या नेतृत्वाखाली त्यांनी कंपनीचे ब्रँडेड शीतपेयांकडे वळवले आणि कंपनीच्या धोरणांमध्ये आवश्यक बदल केले. (हेही वाचा, Adar Poonawalla Buys Aberconway House: अदार पूनावाला खरेदी करणार लंडन येथील सर्वात महागडे अॅबरकॉनवे हाऊस)

भारतातील आघाडीचा मध्य निर्मिती व्यवसाय

आजघडीला रॅडिको खेतान भारतीय निर्मित विदेशी मद्य (IMFL) च्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक बनला आहे. ज्यामध्ये ताडी किंवा अॅरॅक सारख्या स्थानिक अल्कोहोलयुक्त पदार्थ म्हणून वर्गीकृत नसलेल्या सर्व स्पिरीट्सचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, कंपनीचा 80% महसूल आता या विभागातून येतो.

भारतीय मद्य बाजारपेठेतील व्यापक ट्रेंड

रॅडिको कंपनीची आर्थिक वाढ भारतीय मद्य बाजारपेठेतील व्यापक ट्रेंडचेही प्रतिबिंब आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या कार्यरत लोकसंख्येमुळे, भारतातील अल्कोहोलचे प्रमाण 2022 ते 2027 दरम्यान 4% च्या चक्रवाढ दराने वाढण्याची शक्यता आहे. जी जागतिक सरासरीपेक्षा चार पट जास्त आहे. 2027 पर्यंत, भारतातील अल्कोहोलिक शीतपेयांची विक्री 64 डॉलर अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सन 2021 मध्ये 52 अब्ज डॉलर इतकी होती.

रॅडिको खेतान कंपंनीचे स्पर्धक

रॅडिको खेतान ही या कंपनीला बाजारपेठेतही जोरदार स्पर्धा करावी लागते. रॅडिको खेतान ही त्यांची सर्वात मोठी डिएजिओची सूचीबद्ध उपकंपनी आहे. जी यापूर्वी विजय मल्ल्याद्वारे चालवली जात होती. याशिवाय मुंबईस्थित अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स, ऑफिसर्स चॉईस व्हिस्कीचे निर्माते आणि गोव्यातील स्टिलडिस्टिलिंग स्पिरिट्स इंडिया आणि थर्ड आय डिस्टिलरी होल्डिंग्ज यांसारख्या कंपन्यांशीही त्यांना स्पर्धा करावी लागते.

रामपूर डिस्टिलरी अँड केमिकल कंपनी

रॅडिको खेतान पूर्वी रामपूर डिस्टिलरी अँड केमिकल कंपनी लिमिटेड या नावाने ओळखले जात होते. त्यांचे वडील जीएन खेतान यांनी 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला तोट्यात चाललेली कंपनी विकत घेतली होती. खेतान यांना 1995 मध्ये त्यांच्या वडिलांकडून डिस्टिलरीचा वारसा मिळाला जेव्हा जीएन खेतान यांनी त्यांच्या चार मुलांमध्ये कौटुंबिक व्यवसाय विभागले. ललित खेतान यांनी 2020 च्या मुलाखतीत फॉर्च्युनला सांगितले की, “इयत्ता 9वी पासूनच, मला दारूच्या व्यापारात यायचे आहे हे मला अगदी स्पष्ट होते. तेव्हा आमचे बाजार भांडवल सुमारे 5 कोटी रुपये होते. आज ते 5,000 कोटींहून अधिक आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now