Indian Navy Personnel Sentences: हेरगिरी प्रकरणात कतार कोर्टाने भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची शिक्षा कमी केली

कतारच्या न्यायालयाने (Qatar Court) कथित हेरगिरी प्रकरणात (Espionage Case) नुकतेच दोषी ठरलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांच्या (Indian Navy Personnel) शिक्षेमध्ये सुधारणा केली आहे.

Sentences | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कतारच्या न्यायालयाने (Qatar Court) कथित हेरगिरी प्रकरणात (Espionage Case) नुकतेच दोषी ठरलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांच्या (Indian Navy Personnel) शिक्षेमध्ये सुधारणा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) याबाबत दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, कतारच्या अपील न्यायालयाने दाहरा ग्लोबल प्रकरणात शिक्षा कमी केली आहे. तथापि, न्यायालयाने काय म्हटले हे स्पष्ट केले नाही, या प्रकरणात तपशीलवार निकालाची प्रतीक्षा आहे. कतारच्या कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्सने नौदलाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध भारत सरकारने दाखल केलेल्या पूर्वीच्या अपीलनंतर शिक्षेमध्ये बदल करण्यात आला आहे.

कतार कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा

भारताने कतार सरकारकडे केलेले आपील कतारच्या प्रथमवर्ग न्यायालयाने स्वीकारले होते. ज्यामुळे शिक्षा कमी झाली. परंतू, पुढील शिक्षेचा अथवा निर्णयाचा तपशील अद्याप जारी झाला नाही. त्यामुळे संपूर्ण तपशील येईपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी भारतीय अधिकारी कायदेशीर प्रतिनिधी आणि कुटुंबातील सदस्यांशी जवळून समन्वय साधत आहेत. (हेही वाचा, Indian Ex Navy Officers Death Penalty: भारतासाठी दिलासादायक बातमी! कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची याचिका मान्य)

परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत विधान

एका अधिकृत निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अपील न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यात आला आहे. मात्र, पुढील कायदेशीर कारवाई आणि भूमिका याबातब केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. निवेदनात असे लिहिले आहे की, कतारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकारी आज अपील कोर्टात कुटुंबातील सदस्यांसह उपस्थित होते. आम्ही या प्रकरणाच्या सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत करत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकार्‍यांकडेही मांडत राहू. (हेही वाचा, MEA Jaishankar On Qatar- Indian Detainees: परराष्ट्र मंत्री एस शंकर यांनी घेतली कतार मध्ये अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट)

प्रकरणाची पार्श्वभूमी

अल दाहरा या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांना हेरगिरीच्या आरोपाखाली गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. कतारी अधिकारी किंवा भारत सरकारने या आरोपांचे स्वरूप सार्वजनिकपणे उघड केलेले नाही.

भारतीय नौदलाकडूनही प्रतिक्रिया

नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला प्रश्नाकडे लक्ष वेधताना आश्वासन दिले की, सरकार कतारमध्ये तुरुंगात असलेल्या माजी नौदलाच्या कर्मचार्‍यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अॅडमिरल कुमार यांनी मीडिया ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, "अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल यासाठी आम्ही अधिक विस्तारीत पातळीवर काम करत आहोत.

एक्स पोस्ट

26 ऑक्टोबर रोजी फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या कतारच्या कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्सने दिलेल्या सुरुवातीच्या निर्णयावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. कतार कोर्टाचा धक्कादायक निर्णय असे म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने सर्व उपलब्ध कायदेशीर वापरले जाणार असल्याचे म्हटले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now