Vijay Singla Arrested: आरोग्य मंत्रीपदावरून हकालपट्टी करताच विजय सिंगला यांना अटक; 7 मे पर्यंत पोलीस कोठडी

राज्यातील भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर सिंगला यांना पदावरुन तत्काळ हटविण्यात आले.

Vijay Singla | (Photo Credit: FB )

पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचीत आम आदमी पक्षाच्या (Aap, Aam Aadmi Party) सरकारमधील आरोग्यमंत्री विजय सिंगला (Vijay Singla) यांना पदावरुन हटविण्यात आले आहे. राज्यातील भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर सिंगला यांना पदावरुन तत्काळ हटविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे पदावरुन हटविल्यानंतर अल्पावधीतच त्यांना पंजाब पोलिसांकडून अटकही करण्यात आली. अटक होण्यापूर्वी काहीच वेळापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत गुन्हा दाखल करणयाचे आदेश दिले होते. दरम्यान, न्यायालयाने सिंगला यांना 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी म्हटले की, आरोग्यमंत्री विजय संगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंगला यांच्यावर एका कंत्राटात कथीत रुपात कमिशन मागितल्याचा आरोप आहे.याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी एक व्हिडिओ जारी करत सिंगला यांच्या विरोधात कडक कारवाई करत असल्याचे सांगत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकत असल्याचे म्हटले. (हेही वाचा, Punjab: भगवंत मान यांचा मोठा निर्णय; आमदारांना आता फक्त एकाच टर्मसाठी मिळणार पेन्शन, कुटुंब भत्त्यातही कपात)

ट्विट

कू

Koo App

आम आदमी पक्षाने म्हटले आहे की,पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचार विरोधी मॉडेलशी अनुरुप असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आपचे खासदार राघव चड्ढा यांनी म्हटले की, त्यांचा एकमेव पक्ष असा आहे ज्याच्याकडे भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्याचा प्रामाणिकपणा, धाडस आणि इमानदारी आहे. आम्ही हे दिल्लीमध्ये पाहिले आणि पंजाबमध्येही पाहिले. आम आदमी पक्षाला पंजाबमधून बहुमताने सत्ता मिळाली आहे. त्यानतर भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदावर निवड करण्या आली.