Punjab Shocker: वाढदिवसादिवशी ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा; 10 वर्षांच्या Birthday Girl चा मृत्यू

हळूहळू तिचे शरीर थंड होऊ लागले. त्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मानवीला मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

केक खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा (Photo Credit : Pixaby)

Girl Died After Consuming Cake: पंजाबच्या (Punjab) पटियाला (Patiala) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एका 10 वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी केक (Cake) खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. याशिवाय अन्य 4 जणांची प्रकृती बिघडली आहे. मुलीच्या वाढदिवसादिवशी कुटुंबीयांनी ऑनलाइन केक मागवला होता व हा केक खाल्ल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदालत बाजार येथील केक कान्हा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 304-अ आणि 273 लागू केले आहेत.

हे प्रकरण पटियालाच्या अनाज मंडी पोलीस ठाण्यात येणाऱ्या अमन नगरमधील आहे. मानवी असे मृत मुलीचे नाव आहे. याबाबत माहिती देताना कुटुंबीयांनी सांगितले की, मानवीचा वाढदिवस असल्याने त्यांनी त्या दिवशी ऑनलाइन केक ऑर्डर केला होता. हा केक खाल्ल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची तब्येत बिघडली. प्रत्येकाला मळमळ आणि उलट्या यांसारखी अन्न विषबाधाची लक्षणे दिसू लागली.

रात्री उशिरा मानवीची प्रकृती आणखीनच खालावली. हळूहळू तिचे शरीर थंड होऊ लागले. त्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मानवीला मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. स्थानिक अहवाल पुष्टी करतात की, बेकरी दुकानाच्या मालकावर आयपीसीच्या कलम 273 आणि 304A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूला हा केकच कारणीभूत असल्याचा दावा करत कुटुंबीयांनी बेकरी आणि त्यातून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या दर्जाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत तपास सुरू आहे. (हेही वाचा: Deoria Cylinder Blast: उत्तर प्रदेशातील देवरिया येथे सिलिंडरचा स्फोट; महिलेसह 3 मुलांचा मृत्यू)

दरम्यान, याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये केरळमध्ये असेच एक प्रकरण उघडकीस आले होते. कोची येथील एका भोजनालयात शोरमा खाल्ल्यानंतर एका 24 वर्षीय व्यक्तीचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने जिथून जेवण ऑर्डर केले ते रेस्टॉरंट अधिकाऱ्यांनी बंद केले होते व या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.